शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (18:49 IST)

Cool in Summer मुलांनी समरमध्ये कूल कसे दिसायचे, जाणून घ्या

slives shirts
उन्हाळ्यात मुलांची पसंत स्लीवलेस टीशर्ट!
आजकालचे मुलं-मुली एक-दुसऱ्यांची नक्कल करण्यात एक्स्पर्ट झाले आहेत. मग ती हेअर स्टाइल असो किंवा कपड्यांची, ते वेळो वेळी त्याची नक्कल करतात. आजकाल मुलांना मुलींसारखे स्लीवलेस टीशर्ट्स घालायला आवडतात. प्रत्येक जागेवर तुम्हाला स्लीवलेस टीशर्ट घातलेले मुलं दिसतील. 
 
आता फुथपाथ असो की मोठं मोठ्या कंपन्यांचे शोरूम्स असो सर्व ठिकाणी मुलांचे स्लीवलेस टीशर्टने आपली छाप सोडली आहे. बाजारात बऱ्याच रंगात आकर्षक डिझाइनचे स्लीवलेस टीशर्ट उपलब्ध आहेत त्यात कॅप वाले, बीन कॅप, फुटबॉल, क्रिकेट खेळाडूंचे लकी नंबर, नाव, फोटो आणि स्लोगन असलेले स्लीवलेस टीशर्ट बाजारात युवांना आकर्षित करीत आहे. स्लीवलेस टीशर्ट माचो मॅनचे लुक देतात आणि मुली त्यांच्याकडे लवकरच आकर्षित होतात. हे टीशर्ट आरामदायक असून हॉट लूक देतात. 
 
मुलांना हॉट लुक देणाऱ्या स्लीवलेस टीशर्ट्स बाजारात 200 रुपयांपासून 300 रुपयांच्यामध्ये उपलब्ध आहे, तसेच ब्रांडेड स्लीवलेस 400 ते 600 रुपयांमध्ये आरामात उपलब्ध होतात. मग आता स्लिवलेस टी शर्ट घाला आणि माचो मॅन दिसा.