रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जून 2024 (21:38 IST)

बिअरमध्ये डुंबायचे, बिअरमध्येच पडायचे, पापण्या मिटून जगाला भुलायचे; बिअरबाथ स्पाचा ट्रेंड

अलीकडच्या वर्षांमध्ये निरोगी जीवनशैलीचा ट्रेंड जगभरात कमालीचा लोकप्रिय होतो आहे. त्यातच बिअर स्पा सारख्या अनोख्या ट्रेंडचादेखील समावेश आहे. एकीकडे बिअरसारखं लोकप्रिय मद्य आणि दुसरीकडे आरोग्य यांचा मिलाफ साधणाऱ्या बिअर स्पामुळे खरोखरंच आरोग्याला फायदे होतात का? त्याचा इतिहास काय? जगभरात याबद्दल काय विचार केला जातो आहे? या मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा...
 
आईसलँड, स्पेन आणि अमेरिकेत बीअर स्पा अलीकडेच सुरू झाले आहेत. मात्र ते बिअरच्या बालेकिल्ल्याचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या देशातील जुन्या परंपरेशी नातं जोडतात. तो देश म्हणजे झेक रिपब्लिक.
 
मी 1,000 लिटर पाण्यानं भरलेल्या ओक वृक्षाच्या लाकडी टबमध्ये उडी मारण्याच्या तयारीत असताना 16 व्या शतकातील डॅनिश खगोलशास्त्रज्ञ आणि इतिहासातील एक महान शास्त्रज्ञ असलेल्या टायको ब्राहे यांच्या काचेच्या रंगीत तुकड्यापासून तयार केलेली प्रतिमा माझ्याकडे पाहत होती.
 
निकोला स्कायपालोवा मला मदत करत होती. तिनं पाण्यामध्ये टाकण्यासाठी मुख्य घटकांनी भरलेलं मोठं लाकूड हाती धरलं होतं.
 
"हा हॉप्स आहे. यामुळे तुमच्या शरीरातील तणाव दूर होतो आणि तुमच्या शरीरातील छिद्रे मोकळी होतात. ही मद्य उत्पादक बुरशी (यीस्ट) आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी असतात आणि यामुळे तुम्ही तरुण दिसता." असं ते टबमध्ये ओतताना ती म्हणाली.
 
त्यामध्ये माल्ट हा आणखी एका आरोग्यदायी घटक टाकण्यात आला.
चाटो स्पा बिअरलँड ( Chateau Spa Beerland)या झेक रिपब्लिकमधील सर्वात भव्य स्पा पैकी एका स्पा मध्ये होतो.
 
या देशानं 1980च्या दशकात या वेगळ्या किंवा विचित्र अशा आधुनिक निरोगीपणाच्या ट्रेंडला जन्म दिला. प्रागमधील यू झ्लेट रुस्की (U Zlaté Hrušky) (याचा अर्थ सोनेरी पेअर असा होतो) (पेअर हे एक पेरूसारखं फळ असतं) या राष्ट्रीय वारसास्थळ असलेल्या मोहक इमारतीत हा स्पा आहे. इथंच टायको ब्राहे राहत होते आणि त्यांनी 1599 मध्ये काम सुरू केलं होतं. आज इथल्या बिअरच्या स्पामध्ये डोळे खिळवून ठेवणाऱ्या रंगीत काचेच्या खिडक्यांपासून ते खगोलीय भित्तीचित्रांपर्यत सजावटीची मांडणी करण्यात आलेली आहे.
 
टबच्या बाजूला वाळलेल्या पेंढ्यापासून बनवलेला एक प्रचंड बेड होता. यात तुम्हाला गरम टबातील एक पारंपारिक झेक अनुभव मिळतो.
 
स्नान घेतल्यानंतर या पेंढ्याच्या खडबडीतपणाद्वारे बेडमधून त्वचेला आणखी उत्तेजित केलं जातं. नॉर्डिक सॉनामध्ये उत्साही लोक ज्याप्रमाणे त्यांच्या त्वचेवर बारीक फांद्या किंवा डहाळ्या मारतात तसाच हा प्रकार आहे. यामुळे काहीतरी नैसर्गिक गोष्टीच्या जवळ गेल्याची भावना त्यातून निर्माण होते.
स्कायपालोवाने माझ्या बिअरबाथे साठी बिअरचे अनेक चमचे ओतले. ही काही फक्त जुनी बिअर नव्हती तर ही एक फिल्टर न केलेली प्रीमियम स्वरुपाची झेक बिअर होती. यामध्ये यीस्टसारख्या महत्त्वाच्या घटकांचा पूर्ण समावेश असून ते जिवंत स्वरुपातच आहे आणि त्यामधील जीवनसत्वं टिकून होती.
 
ऑस्ट्रिया या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या बिअरप्रेमी देशाच्या दरडोई बिअर सेवनापेक्षा झेक रिपब्लिक मध्ये जवळपास दुप्पट बिअरचं सेवन केलं जातं.
 
टबच्या शेजारी असलेल्या सुलभ नळाद्वारे बिअरचा अव्याहत पुरवठा करणं, त्यामध्ये उच्च दर्जाची बिअर स्नानासाठी ओतणं हा अपव्यय आहे असं कदाचित तुम्हाला वाटेल.
 
मी त्यामध्ये स्वत:ला बुडवून घेतलं आणि बाथ बबलिंग सुरू करण्यासाठी जॅक्युझीचं बटण दाबलं. त्यात जशी बिअरच्या गंधाची हवा भरली गेली तसा मी मधुर गडद क्रुसोवाइसचा (1581 मध्ये स्थापन करण्यात आलेलं झेक बिअर उत्पादन केंद्र किंवा कंपनी) ग्लास ओतला आणि बिअर ब्रेडचा एक भाग घेतला. ज्याचा तपकिरी रंग त्याच्या पिठात वापरल्या जाणाऱ्या बिअरमधून येतो. मी मागे टेकून बिअरच्या या विचित्र अनुभवावर विचार करत बसलो.
जगभर वाढणारा वेलनेस ट्रेंड बिअर बाथच्या अनुभवाच्या समर्थकांना असा विश्वास वाटतो की या स्नानातील बबलिंगमधील किंवा बुडबुड्यांमधील संयुगं तुमच्या त्वचेसाठी चांगली आहेत. त्यामुळे स्नायूंवरील तणाव कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारतं.
 
दरम्यान 'हॉपी' सुगंधामुळे आरामदायी वाटतं आणि मूड सुधारतो. या वेलनेस ट्रेंडमधील आनंददायी नाविन्यामुळे आता जगभरात बिअर स्पा सुरू होताना दिसत आहेत.
 
अलीकडेच आईसलॅंड आणि स्पेनमध्ये बिअर स्पा सुरू झाले आहेत. तर डेनव्हर इथं ओकवेल बिअर स्पा ( Oakwell Beer Spa) 2021 मध्ये सुरू झाल्यानंतर 2023 च्या अखेरीस अमेरिकेतील बाल्टीमोर इथं बिअरबाथ ( BierBath) हा स्पा सुरू झाला होता. यंदाच्या वर्षी इंग्लंडच्या पूर्वेस असणारा द नॉरफोक मेड या यूकेमधील पहिला बिअर स्पा सुरू होणार आहे.
 
स्पामधील आरामदायीपणा किंवा विश्रांती आणि बिअर या सुख देणाऱ्या दोन लोकप्रिय गोष्टी युरोपियन वित्तीय सेवांच्या व्यासपीठाबरोबर एकत्र आणण्याची संधी देत असल्यामुळे बिअर स्पा ची संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय होते आहे.
 
द नॉरफोक मेड या स्पामध्ये मॅनेजर असलेल्या इलिझा ओकडन जगभरात बिअर स्पा वाढत असण्यामागचं आणखी एक कारण सांगतात. त्या म्हणतात, "एरवी स्पा कडे महिला अधिक आकृष्ट होतात. त्यामुळे आम्ही विचार केला की या प्रकारच्या स्पा कडे पुरुष आणि जोडपे दोघांनाही आकृष्ट करतील."
 
ब्रजेस या कालव्यांनी वसलेल्या शहरात 2023 मध्ये सुरू झालेला आणि बेल्जियमधील पहिला बिअर स्पा असलेल्या बाथ अॅंड बार्ले ( Bath & Barley) या स्पामध्ये जाणाऱ्या ग्राहकांना त्यांना मिळणाऱ्या सुविधा किंवा अनुभव त्यांच्या गरजांनुरुप बदलून घेता येतात. ज्या प्रमाणे एखाद्या बिअरप्रेमीला वेगवेगळ्या प्रकारच्या मद्यांचा मोहू शकतो हे देखील तसंच काहीसं आहे.
 
याचे सहसंस्थापक लुईस रेसॉव म्हणतात, "बेल्जियममधील शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या वेगवेगळ्या हॉप्समधून तुम्ही स्वत:चा बाथ ब्रू तयार करू शकता. या हॉप्सचं वैशिष्ट्यं वेगवेगळं असू शकतं मात्र त्यांच्यापासून मिळणारे लाभ सारखेच असतात. आम्हाला असंदेखील वाटतं की अंतर्गत सजावट, वापरली जाणारी उत्पादने आणि दिल्या जाणाऱ्या सेवा याचा विचार करता काही झेक स्पाच्या तुलनेत आम्ही अधिक आलिशान अनुभव ग्राहकांना देत आहोत. यामध्ये उत्कृष्ट अन्नाबरोबर बेल्जियन बिअरची सांगड घालण्याच्या पर्यायांचादेखील समावेश आहे. टबमध्ये हॉप स्क्रब पुरवण्याबाबतदेखील आमचं वेगळंपण आहे."
 
2022 मध्ये सुरू झाल्यापासून स्ट्रासबर्गमधील टाका बिअर स्पा (Taaka Beer Spa)हा फ्रान्समधील बिअर स्पाच्या सेवेमध्ये एक पथशोधकाचं काम करतो आहे. या स्पाचे संस्थापक नाओमी क्रॉशॉ म्हणतात, "या संकल्पनेबद्दल स्थानिकांमध्ये प्रचंड कुतुहल निर्माण झालं आहे आणि त्यामुळे स्पा चा अनुभव घेण्यासाठी येणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या प्रदेशातील बिअर संस्कृतीचा अनुभव घेण्याचा एक अभिनव मार्ग म्हणून ही संकल्पना कशी स्वीकारली हेली आहे हे पाहणं खूपच थक्क करणारं आहे."
 
झेक रिपब्लिकचा विचार करता, राजधानीत अर्धा डझन किंवा त्यापेक्षा अधिक बिअर स्पा पूरक आहेत. यातील काही मी प्रागमध्ये घेतलेल्या अनुभवाप्रमाणे संस्मरणीय ऐतिहासिक परिसरात आहेत.
 
आणखी एका राष्ट्रीय स्मारकामध्ये म्हणजे यू झ्लेटेहो बर्नाका (U Zlatého Beránka) (याचा अर्थ झेक भाषेत सोनेरी कोकराजवळ असा होतो) या बरोक काळातील शैली असलेल्या घरात फर्स्ट बिअर स्पा पिल्सन ( First Beer Spa Pilsen)13 व्या शतकात किंग वेनसेस्लास द्वितीय कडून मिळालेल्या मद्यनिर्मितीच्या अधिकाराच्या या शहराच्या वारशाचा वापर करतं.
या प्रदेशातील बिअर संस्कृतीचा अनुभव घेण्याचा एक अभिनव मार्ग म्हणून ही संकल्पना कशी स्वीकारली हेली आहे हे पाहणं खूपच थक्क करणारं आहे." - नाओमी क्रॉशॉ
 
किंवा श्लॉस व्हर्सेलेस या 17 व्या शतकातील हर्बल मद्य गोदामाच्या कोरीव खडबडीत दगडांच्या तळघरात जा, जिथं पहिल्या बिअर स्पा नं मारिआन्स्के लाझने या बोहेमियन शहराला एक अभिनव बिअर आधारित आयाम दिला आहे.
 
ज्यांचे नावाजलेले खनिज असलेल्या झऱ्यांचे पारंपारिक स्पा 18 व्या शतकापासून आहेत. जिथे किपलिंग आणि गोएथ सारख्या लेखकांपासून ते जर्मनीचा कैसर आणि ब्रिटनच्या एडवर्ड (सातवा) पर्यत प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तींनी हजेरी लावली आहे.
 
निरोगीपणा की फक्त एक धारणा
जवळपास प्रत्येक बिअर स्पा, हजारो वर्षांपूर्वीच्या बिअर स्नानाबद्दल बोलतं. जरी यामध्ये स्पा बरोबर बिअरच्या ऐतिहासिक सहअस्तित्वाचा संयोग होत असल्याचं दिसतं असलं तरी प्राचीन काळी बिअर आणि स्पा यांचा एकत्र संबंध आल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.
 
दरम्यान झेक बिअर स्पा नियमितपणे अनेक माजी राजांपैकी एक असलेल्या वेन्सस्लास या राजाचा उल्लेख करत तो नियमितपणे स्पामध्ये स्नान घेत असल्याचा उल्लेख करतात.
 
खेदाची बाब म्हणजे ही गोष्टदेखील बिअर स्पामधील टबच्या शेजारच्या नळ्यातून बिअर प्यायलेल्या व्यक्तीइतकीच भक्कमपणे उभी राहते.
 
"हे नक्कीच खरं नाही. बिअर स्पा चालवण्यासाठी कंपन्यांकडून करण्यात येत असलेली मार्केटिंगची युक्ती आहे. बिअर स्पा सारखे व्यवसाय हे आधुनिक शोध आहेत...मध्ययुगीन काळात कदाचित इतर अनेक गोष्टींप्रमाणे बिअरचा वापर स्नानामध्ये केला जात असेल, मात्र इतर अधिक गहन कारणासाठी नक्कीच केला जात नव्हता," असं लिबर झाजिक म्हणतात. ते बर्नोमधील मासारिक विद्यापीठात युरोपच्या मद्यनिर्मितीच्या इतिहासाचे तज्ज्ञ आहेत. मात्र ते हेदेखील सांगतात की 14 व्या शतकात शाही व्हेन्सस्लासपैकी एक झेक बिअर निर्मात्यांचा आश्रयदाता बनला होता.
 
"बिअरमध्ये त्वचेसाठी लाभदायी तीन घटक असतात: पाण्यात भिजवलेली तृणधान्ये, यीस्ट आणि हॉप्स (बिअरमध्ये वापरली जाणारी फुलं)" - डॉ. सिंडी जोन्स
 
असं असलं तरी निरोगीपणाच्या संदर्भात अधिक भक्कमपणे काही मुद्दे येऊ शकतात.
 
"बिअरमध्ये तीन घटक असतात जे त्वचेसाठी लाभदायी असतात. ते म्हणजे पाण्यात भिजवलेली तृणधान्ये, यीस्ट आणि हॉप्स (बिअरमध्ये वापरली जाणारी फुलं). पाण्यात भिजवलेली तृणधान्ये आणि यीस्ट दोघांमध्येही व्हिटॅमिन बी असतं, ज्यामुळे त्वचेतील पाण्याची पातळी आणि लवचिकता वाढते आणि हायपरपिगमेंटेशन कमी होतं," असं डॉ. सिंडी जोन्स या कोलोरॅडो अॅरोमॅमटिक्समधील बायोकेमिस्ट म्हणतात.
हॉप्स मध्ये झॅंथोहुमल आणि ह्युमुलोन मोठ्या प्रमाणात असतं. हे शक्तीशाली अँटिऑक्सिडंट घटक असतात ज्या कॅन्सरप्रतिकारक आणि दाहनाशक गुणधर्म असतात. त्याचबरोबर त्यामध्ये अँटिबॅक्टेरियल वैशिष्टयं असतात ज्यामध्ये त्वचा बरी करण्याचे गुणधर्म असतात.
 
हॉप्सच्या अर्कामुळे चिंता, कमी स्वरुपाचं नैराश्य किंवा उदासीनता आणि तणाव कमी होऊ शकतो असं अभ्यासातून आढळलं आहे. झोपेसाठी उपयुक्त म्हणून पारंपारिक औषधांमध्ये हॉप्सच्या वापराचा प्रदीर्घ इतिहास असून त्याला वैज्ञानिक आधारदेखील आहे.
 
जोन्स पुढे सांगतात, "आणि अलीकडच्या काळात त्वचेच्या आरोग्यसंदर्भात हॉप्सकडे वैज्ञानिक विश्वातून अधिक लक्ष दिलं जातं आहे. त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी उपयुक्त असलेल्या कोलॅजनची निर्मिती त्यामुळे वाढू शकते आणि त्वचेतील इन्फ्लेमेशन कमी होऊ शकतं."
 
कार्ल्सबर्ग ही जगातील बड्या मद्य उत्पादक कंपनीनं बिअर कॉस्मेटिक ट्रेंडमधील संधींवर लक्ष देण्याचं ठरवलं आहे. त्या दृष्टीनंच 2015 मध्ये त्यांनी बिअर ब्युटी लाईन बाजारात लॉंच केलं होतं. ते लॉंच करताना त्याचं प्रमोशन करण्यासाठी त्यांनी एक विनोदी व्हिडिओदेखील आणला होता.
 
मॅन्युफॅक्च्युरा या झेक रिपब्लिकमधील कॉस्मेटिक्स कंपनीनं त्यांची विस्तीर्ण श्रेणीतील उत्पादनं विकण्यासाठी देशभरात त्यांच्या दुकानांचा विस्तार केला आहे. यामध्ये बाथ सॉल्टचा समावेश आहे ज्यामध्ये हॉप्स आणि जवामधील अर्क असतं.
 
मात्र यांचा वापर घरी स्नानासाठी केल्यास त्याबरोबर अमर्यादित उच्च प्रतीची बिअर किंवा स्वादिष्ट बिअर ब्रेड किंवा पेंढीच्या बेडवर लोळण्याचा आनंद घेता येणार नाही. आणि याच गोष्टी आहेत ज्यामुळे बिअर स्पा मध्ये खराखुरा विचित्र अनुभव घेता येतो.
 
बीबीसी ट्रॅव्हल्सचं वेल वर्ल्ड हे निरोगी जीवनशैलीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या जगभरातील विविध मार्गांचा शोध घेतं.
 
Published By- Priya Dixit