शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 31 डिसेंबर 2019 (15:45 IST)

नवं वर्ष नवे आनंद आणेल

नव्या संकल्पांसह नव्या वर्षाचे स्वागत करू या.नवीन वर्षात घेतलेल्या संकल्पांच्या पूर्ती साठी प्रयत्न करा. नवे वर्ष आपल्या जीवनात आनंद आणि भरभराटी राहो .या साठी वास्तुशास्त्रात आणि फेंगशुई मध्ये काही उपाय आहे. ते करून बघावे.  
 
चला मग ते उपाय काय आहे ते जाणून घेऊ या.
लाफिंग बुद्धा  : 
लाफिंग बुद्धाचे फेंगशुई मधील महत्त्वाचे स्थान आहे. हसणारा बुद्धा घरात सुख आणि समृद्धी आणतो. हे आपल्या घरात ठेवणे खूप महत्त्वाचे मानले जाते. पण ह्याचे काही नियम आहे. हे आपण स्वतःसाठी खरेदी करत नाही. नवीन वर्षात आपण आपल्या प्रिय व्यक्तीस हे भेट देऊ शकता.
तांब्याचे नाणे : 
घराच्या दारावर तांब्याचे नाणे लाल दोऱ्याने बांधणे पण शुभ मानले जाते. ह्यामुळे घरात संपत्ती आणि समृद्धी येते.
कासव :
फेंग शुईमध्ये कासव आनंदाचे प्रतीक मानले जाते. वैवाहिक जीवनात सौख्य मिळवण्यासाठी घरात हे ठेवावे. 
लाल मेणबत्ती : 
घरात लाल रंगाची मेणबत्ती वापरा. नव्या वर्षात घराला स्वच्छ ठेवावे. घराला सुगंधित ठेवा. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात देव पूजा आणि पूर्वजांचे ध्यान करून करा. 
फिश एक्वेरियम :  
नवीन वर्षात फिश एक्वैरियम देखील घरी आणता येऊ शकेल. हे शुभतेचे प्रतीक मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. 
रोपटं लावा :
नवीन वर्षात घरी रोपटं लावा पण काटेरी झाडे लावू नका. 
विंड चाइम्स :
घरात शयनकक्षाच्या भिंतींवर विंड चाइम्स लावता येतात. यामुळे आपसात प्रेम वाढते.
 
टीप:- या लेखात दिलेल्या माहितीवर, आम्ही दावा करत नाही की ही पूर्णपणे सत्य आणि अचूक आहेत आणि हे उपाय योजल्याने अपेक्षित निकाल मिळेल. हे योजण्यापूर्वी वास्तू शास्त्र तज्ज्ञाचा सल्ला घ्या.