बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 22 मे 2019 (14:49 IST)

फेंगशुई : या टिप्सचा वापर करून मिळवा पसंतीचा जोडीदार

प्रत्येकाची इच्छा असते की त्याला आवडीचा जोडीदार मिळायला पाहिजे. पण बर्‍याच वेळा असे होत नाही आणि आम्ही नुसते पश्चात्ताप करत राहतो. पण फेंगशुईत याचे समाधान आहे, काही टिप्सचा वापर करून तुम्ही तुमच्या आवडीचा जोडीदार मिळवू शकता. या टिप्सचा वापर करून तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी येऊ लागते आणि तुम्हाला जसा जोडीदार हवा आहे तोच व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतो. तर जाणून घेऊ फेंगशुई टिप्सबद्दल ....
 
1. बेडरूममध्ये सूर्यास्तसमयाचे फोटो किंवा पोस्टर लावू नये. हे तुमच्यात निगेटिव्ह एनर्जी उत्पन्न करेल.  
 
2. बेडरूममध्ये जर सिंगल चेयर, सोफा इत्यादी ठेवला असेल तर त्याला जोड्यात ठेवा. सिंगल चेयरचा अर्थ असाकी तुम्हाला एकटे राहणे पसंत आहे.  
 
3. तुम्ही तुमच्या खोलीच्या दक्षिण पश्चिम भिंतीवर लाल रंग लावा. ही भिंती तुमच्या रिलेशनशिपसाठी फारच महत्त्वाची असते.  
 
6. बेड आणि भिंतीच्या मध्ये व्यवस्थित गॅप असणे फारच गरजेचे आहे, ज्याने आत बाहेर करण्यात अडचण येणार नाही.  
 
5. झोपताना ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे की तुमचे पाय कधीही दाराकडे नसावे.