रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

केसांच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी एक घरगुती उपाय

केसांची ग्रोथ न होणे आता अगदी सामान्य समस्या झाली आहे. केसांची वाढ व्हावी म्हणून महिला खूप प्रयत्न करत असतात, पैसा देखील खर्च करतात तरी हवे तसे परिणाम दिसून येत नाही. अशात आम्ही आपल्या अगदी स्वस्त उपाय सांगत आहोत. एक अशी वस्तू जी आपल्या किचनमध्ये नेहमी असते. कांदा. आपण ऐकलं असेल की कांदा केसांसाठी खूप फायदेशीर आहे पण कशा प्रकारे वापरायचे हे आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
 
ओनियन हेअर पॅक याने केसांसंबंधी अनेक समस्या जसे दोन तोंडी केस, केस गळणे, कोंडा, ड्राय हेअर्स आणि इतर दूर होऊ शकतात. स्वस्थ, निरोगी आणि लांब केसांची आवड असल्यास हे पॅक घरी तयार करा.
 
कांद्याचा रस
कांद्याचा रस स्कॅल्पवर लावून अर्धा तास तसेच राहू द्या. या दरम्यान टॉवेलने केस झाकून घ्या. याने रस मुळात शिरेल. नंतर शैम्पूने केस धुऊन टाका.
 
कांदा आणि नारळ तेल
केसांची वाढ हवी असल्यास नारळ तेलात कांद्याचा रस मिसळावा. याने मालीश करून टॉवेल गुंडाळून वाफ घ्यावी. याने स्कॅल्पवरील डेड स्कीन नाहीशी होईल आणि केस वाढण्यात मदत मिळेल.
 
कांद्या आणि बिअर
बिअरने केसांना नैसर्गिक रित्या चमक मिळते. कांद्याच्या रसात बिअर मिसळून केसांना लावल्याने कंडिशनिंग देखील होते. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा अमलात आणू शकता. 
 
कांदा आणि मध
केसांच्या विकासासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. कांद्याची पेस्ट तयार करून त्यात काही थेंब मधाचे मिसळावे. ही पेस्ट केस कमी असलेल्या जागेवर लावावी. केस दाट होण्यात मदत मिळेल.
 
कांदा आणि लिंबू
कोंड्यामुळे परेशान असाल तर लिंबू आणि कांदा वापरावा. लिंबाच्या रसामुळे स्कॅल्प स्वच्छ होत असून केस गळणे कमी होण्यास मदत मिळते.
 
कांदा आणि रम
एका ग्लासात रम घेऊन त्या किसलेला कांदा घालून रात्रभर ठेवा. सकाळी हे मिश्रण गाळून डोक्याची मालीश करा. याने केसांना मजबुती मिळेल आणि केसांची वाढ देखील होईल.
 
कांदा आणि अंडं
अंड्याचा पांढरा भाग आणि कांद्याच्या रस मिसळून घ्या. हे मिश्रण अर्धा तासासाठी लावून ठेवावे नंतर शैम्पू करावे.
 
कांद्याच्या रसाने निर्मित पॅक लावल्याने केस लांब, चमकदार, दाट होण्यास मदत मिळेल. परंतू एकावेळी एकाच प्रकाराचा पॅक वापरणे योग्य ठरेल.