शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

असे करावे एकादशीचे व्रत

आषाढी एकादशीचे महत्त्व
आषाढ महिन्यातील शुक्ल/शुद्ध पक्षातील अकरावी तिथी ही देव-शयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. 
या दिवसापासून चातुर्मास (चार महिन्यांचा काळ) सुरू होतो, तो कार्तिकी एकादशीला संपतो. 
अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे, क्षीरसागरात शेषनागावर, योगनिद्रेस जातात.
या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो.  अनेक भक्त पायाची वारी करत आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी पंढरपूरला जमा होतात. वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते आणि ही साधना म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते.
कशी करावी एकादशी
दशमीला एकभुक्त रहावे.
एकादशीला प्रातःस्नान करावे. 
तुळस वाहून विष्णुपूजन करावे. 
मूर्तीला मंजिरींचा हार वाहिली पाहिजे.
संपूर्ण दिवस उपवास करावा. रात्री हरिभजन करत जागरण करावे. 
द्वादशीला वामनाची पूजा करावी आणि पारणे सोडावे. या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा.