रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: शनिवार, 19 जून 2021 (13:44 IST)

गंगा दशहरा महात्म्य, पूजा विधी

गंगा दशहरा हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. या दिवशी आई गंगा पृथ्वीवर आली, ज्येष्ठ शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दशमी याला दशहरा म्हणतात. सनातन धर्मात, स्नान करणे, दान करणे हा प्रत्येक उपवास उत्सवांशी संबंधित आहे जेणेकरुन पृथ्वीवरील माणुसकी आणि एखाद्याला मदत करण्याची इच्छा व्यक्तीमध्ये कायम राहते आणि पृथ्वीवर नेहमीच सामंजस्य आणि परस्पर प्रेम राहतं आणि म्हणूनच हे व्रत सांगण्यात आले आहे. म्हणूनच उपवास ठेवून आपलं आरोग्य चांगले राहील, म्हणून स्नान, दानधर्म, आणि व्रत केले जातात. स्कंद पुराणात असे लिहिले आहे की, ज्येष्ठ शुक्ल दशमी ही संवत्सरमुखी मानली जाते, ज्यामध्ये स्नान व दान याचे विशेष महत्त्व आहे. एखाद्या पवित्र नदीवर जाऊन अर्घ्य (पुजादिक) आणि तिलोदक (तीर्थप्राप्तीसाठी तर्पण) करावं आणि त्या नदीच्या स्वच्छतेचीही काळजी घ्यावी. तरच आपली गंगा माता व्रत आणि पूजन पूर्ण होईल.
 
जे असे करतात ते महापातांच्या समान दहा पापांपासून मुक्त होतात. असे म्हटले गेले आहे की आपण आपल्या सभोवतालच्या नद्यांची काळजी घ्यावी आणि त्यांना आई गंगाप्रमाणे स्वच्छ ठेवावं, जे समाजासाठी असे कार्य करतात ते पापांपासून मुक्त होतात.वराह पुराणात असे लिहिले आहे की, ज्येष्ठ शुक्ल दशमी बुधवारी, हस्त नक्षत्रात स्वर्गातून सर्वश्रेष्ठ नदी उतरली होती, ती दहा पापांचा नाश करते. म्हणूनच त्या तारखेला दसरा असे म्हणतात. या दहा योगांमध्ये ज्येष्ठ महिना, शुक्ल पक्ष, बुधवार, हस्त नक्षत्र, गर, आनंद, व्यतिपात, कन्या चंद्र, वृषभ सूर्य, स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
 
भविष्य पुराणात असे लिहिले आहे की जो कोणी या दसर्‍याच्या दिवशी गंगाच्या पाण्यात उभे राहून दहा वेळा हे स्तोत्र पठण करतो, तो गरीब असमर्थ असो किंवा त्याला देखील प्रयत्नाने गंगाची उपासना करुन फळ प्राप्त होतं. 
 
गंगा दशहरा पूजा- विधि
 
सकाळी लवकर उठून स्नान करावं.
या दिवशी गंगा स्नानाचे अत्यंत महत्त्व आहे, परंतु हे शक्य नसल्यास घरीच स्नान करावं.
अंघोळीच्या पाण्यात गंगा जल घालावं आणि देवी गंगेचं ध्यान करुन स्नान करावं.
देवघरात गंगा जल शिंपडावं.
घराच्या मंदिरात दीप प्रज्वलित करावं.
सर्व देवी-देवतांना गंगेच्या पाण्याने अभिषेक करावं.
या दिवशी महादेवाची आराधना केल्याने शुभ फळ प्राप्ती होते.
या दिवशी गंगा देवीचं ध्यान करावं.
शक्य असेल तर व्रत करावं.
गंगा आरती करावी.
गंगेच आवाहन करावं आणि नैवेद्य दाखवावा. 
देवाला सात्विक पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.
 
गंगा भक्ती मंत्र 'ओम नमो भगवती हल्ली हल्ली मिली मिली मिली गंगे मां पव्य पाव स्वाहा' 
हा गंगाजींचा मंत्र आहे.