मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

शिका परदेशी भाषा

मित्रांनो, तुम्हाला भाषेची आवड असेल तर परदेशी भाषा शिकून तुम्ही उत्तम करिअर घडवू शकता. हल्ली शैक्षणिक क्षेत्रापासून ते अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये परदेशी भाषेचं ज्ञान असलेल्या लोकांना चांगलाच वाव मिळतो. चला बघू कोणत्या भाषा शिकल्यानंतर भविष्यात तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध होतील.
 
चायनीझ भाषा- या भाषेकडे अनेकांचा कल आहे. जगभरात जवळपास 21 टक्के लोक चीनी भाषा बोलतात. चीनी भाषा शिकणं थोडं कठिण आहे. पण ही भाषा शिकल्यानंतर बर्‍याच संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात.
 
स्पॅनिश-  ही भाषा 20 देशांमध्ये बोलली जाते. म्हणूनच अनेक भारतीय ही भाषा शिकण्याला प्राधान्य देतात. स्पॅनिश आणि इंग्रजी यात बरंच साम्य आहे त्यामुळे ही भाषा तुलनेनं बरीच सोपी आहे.
 
रशियन- ही भाषा जगातल्या 26 देशांमध्ये बोलली जाते. त्यामुळे ही शिकण्याकडेही अनेकांचा ओढा आहे. पर्यटनाच्या क्षेत्रात या भाषेचा बराच वापर होता.
 
जपानी- या भाषेलाही बरीच मागणी आहे. अनेक जपानी कंपन्या भारतात येत आहेत. तसंच भारतीयही जपानमध्ये कामानिमित्त स्थायिक होत आहेत, त्यामुळे जपानी भाषा शिकण्यावर भर दिला जात आहे.
 
जर्मन- जर्मन भाषेकडे अनेकांचा कल असतो. जगभरात ही भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. त्यामुळे आजही ही भाषा लोकांना आकर्षित करते.
 
फ्रेंच- ही भाषा शिकून आपण शैक्षणिक क्षेत्रात तसेच इतर क्षेत्रांमध्येही करिअर करु शकता.