गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (13:21 IST)

Medical Prescription मध्ये डॉक्टरांच्या कोड शब्दांचे अर्थ काय

जेव्हा आपण गंभीर आजारी पडतो, तेव्हा आपण थेट डॉक्टरांकडे जातो, तेव्हा ते आपल्याला वेगवेगळ्या वेळी घेण्यासाठी विविध औषधे लिहून देतात. आम्ही मेडिकलमधून औषधे खरेदीही करुन आणतो, परंतु प्रत्येक वेळी डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही कोणते औषधे कधी घ्यावे याचा विसर पडतो. तथापि, डॉक्टरांनी औषधाच्या शेवटी लिहिलं असतं की औषध कधी घ्यायचं आहे. परंतु वैद्यकीय शब्दावलीचे ज्ञान नसल्यामुळे सामान्य लोकांना ते समजत नाही. तर सामान्यत: वैद्यकीय अटी कशा समजून घ्याव्यात ते जाणून घेऊया -
 
Rx = उपचार
q  =  प्रत्येक
qD =  दररोज
qOD = एकदिवसा आड
qH = दर तासाला
S =  च्या विना
C = च्या सोबत
SOS = आवश्यक असल्यास
QAM = दर सकाळी
QP = दर रात्री
HS = झोपताना
PRN = आवश्यकतेनुसार
BBF = ब्रेकफास्टपूर्वी 
AC = लंच पूर्वी
PC = लंच नंतर
BID = दिवसातून दोनदा
TID = दिवसातून तीन वेळा
QID = दिवसातून चार वेळा
OD  = दिवसातून एकदा
BT = झोपताना
BD = डिनरच्या पूर्वी
Tw = आठवड्यातून दोनदा 
Q4H = प्रत्येक चार तासात
 
तर आता आपल्यासाठी हे समजणे सोपे होईल. जर आपण डॉक्टरांना विचारायला विसरलात तर आपण या टर्म्सद्वारे देखील समजू शकता.