रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (15:19 IST)

सामान्य ज्ञान :आकाश निळे आहे पण ढग काळे पांढरे का दिसतात?

पावसाळ्यात आपण बऱ्याचदा लक्ष दिले असेल की आकाशात पांढरे ढग दिसतात.पण जेव्हा गडगडाटी वादळा सह मुसळधार पावसाची शक्यता असते तेव्हा ढग पूर्णपणे काळ्या रंगाचे दिसतात.असं का होत? चला तर मग जाणून घेऊ या.
 
वास्तविक या मागे कोणताही नैसर्गिक चमत्कार नाही तर वैज्ञानिक कारणं आहे.
देशात मान्सूनचे आगमन झाले आहे.सर्वत्र पाऊस सुरु आहे.आकाशात काळे आणि पांढरे ढग दिसतात.आपण कधी  विचार केला आहे का की ,आकाश तर निळे असतात पण ढग काळे आणि पांढरे का दिसतात? चला जाणून घेऊ या.
 
पाण्याचे थेंब किंवा ढगांमध्ये असलेले सूक्ष्म कण सूर्यापासून निघणाऱ्या किरणांना परावर्तित करतात. सोप्या भाषेत किरण परत पाठवले जातात आणि फक्त पांढरा रंग शिल्लक राहतो.ढग सूर्यापासून निघणारे पांढरे किरण शोषून घेतात.म्हणूनच आपल्याला ढगांचा रंग पांढरा दिसतो.
 
आपण हे अशा प्रकारे देखील समजू शकता. ढगांमध्ये बर्फ किंवा पाण्याचे थेंब असतात, ते सूर्यापासून निघणाऱ्या किरणांच्या तरंग लांबी पेक्षा मोठे असतात आणि सूर्याची किरणे त्यांच्यावर पडताच ते त्यांना परावर्तित करतात आणि ढग आपल्याला पांढरे दिसू लागतात.या उलट प्रक्रिया झाल्यावर तर ढग आपल्याला काळे दिसतात. म्हणजे जेव्हा ढगातील पाण्याचे थेंब सर्व रंग शोषून घेतात, तेव्हा ढगांचा रंग काळा दिसतो.
 
एखादी वस्तू ज्या रंगला शोषून घेते ती वस्तू त्या रंगाची दिसते.जर एखादी वस्तू सर्व रंग प्रतिबिंबित करते,तर ती फक्त पांढरी दिसेल आणि जी सर्व रंग शोषून घेते, ती वस्तू काळी दिसेल.
 
ढगांचा रंग काळा दिसण्याचे आणखी एक कारण आहे.जर ढग खूप दाट आणि उंच असतील तर ते गडद काळे दिसतील.तर,जाडसर असणे देखील ढगांच्या गडद काळ्या रंगामागील एक कारण आहे.जर ढगांची जाडी जास्त असेल तर सूर्याच्या किरणा खूप कमी प्रमाणात त्यातून जातील.त्याचा परिणाम असा होईल की ढग गडद किंवा काळे दिसतात.
 
आकाश निळा का दिसतो ?
पृथ्वीवरील नैसर्गिक प्रकाशाचा स्रोत सूर्य आहे आणि सूर्याची किरणे पांढऱ्या रंगाची आहेत. स्पेक्ट्रमचे विविध रंग पांढऱ्या रंगापासून उद्भवतात. प्रिझमच्या मदतीने पाहिले असता,हे आढळून आले आहे की सूर्याच्या पांढऱ्या रंगाच्या किरणा लाल,नारंगी,निळा,पिवळा,हिरवा,जांभळा रंग आहेत.
 
जेव्हा सूर्याकडून येणारी किरण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात तेव्हा ते असंख्य कण आणि रेणूंना धडकतात. या दरम्यान, सूर्याचा नैसर्गिक पांढरा रंग धडकतो आणि प्रकाशाच्या विविध रंगांमध्ये विखुरला जातो.प्रकाशाच्या रंगांमध्ये निळा रंग पसरवण्याची सर्वात जास्त क्षमता असते,त्यामुळे ते सर्वत्र वेगाने वातावरणात विखुरलेले असतात आणि जेव्हा आपण पृथ्वीवरून आकाशाकडे पाहतो तेव्हा आकाश निळा दिसतो.