शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (09:10 IST)

सामान्य ज्ञान -भारताचा पासपोर्ट निळा का आहे?

परदेशात प्रवास करण्यासाठी पासपोर्ट वापरतात. या मध्ये परदेशी प्रवास करताना प्रवाशाची ओळख आणि नागरिकत्व नमूद केले असते. पासपोर्ट कायद्यानुसार पासपोर्ट हा एक कायदेशीर कागदपत्र आहे आणि धारक जन्माद्वारे किंवा राष्ट्रीयीकरणाने भारताचा नागरिक असल्याचे प्रमाणित करतो. आपण असा विचार करत असाल की पासपोर्टचा रंग निळा का आहे. तर जाणून घ्या. 
 
जगभरात पासपोर्टमध्ये केवळ चार रंग निवडले आहेत लाल,निळा,हिरवा आणि काळा. निळा रंग शांततेचे प्रतीक आहे. निळा रंग सीए -4 कराराद्वारे देशाने निवडला आहे. हे संयुक्त राज्य अमेरिका,कॅनडा, 15 केरिबियाई देश आणि मरकोसुर ट्रेंड युनियन चे प्रतीक मानले जाते. म्हणून निळे पासपोर्ट भारत, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, या सारखे देशांमध्ये तसेच भारतात निळ्या रंगाचे पासपोर्ट वापरतात. तसेच भारतात तीन रंगाचे पासपोर्ट असतात. लाल डिप्लोमॅट्स साठी,पांढरा-सरकारी अधिकाऱ्यांसाठी आणि निळा सामान्य म्हणजे रेग्युलर पासपोर्ट. निळ्या पासपोर्टसाठी देखील दोन प्रकार आहे एक -ज्यासाठी मायग्रेशन तपासणी आवश्यक आहे आणि दुसरी म्हणजे तपासणी आवश्यक नाही. आता समजले असणार की पासपोर्ट चा रंग भारतात निळा का आहे.