शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

तर असा तयार झाला समोसा!

समोसा हा अधिकश्या लोकांचा आवडता खाद्य पदार्थ. चटपटीत समोसा हा प्रकार भारतातलाच आहे असं आपल्याला वाटतं पण प्रत्यक्षतात हा आपल्याकडला पदार्थ नाही. समोसा हा इराणमधला पदार्थ असून सर्वात आधी तिथेच बनवण्यात आला.
 
इराणमध्ये त्याला सम्सा किंवा सेनबोगास असं म्हटलं जायचं. तेथून तो भारतात आला आणि सगळ्यांच्या चवीत बसला. आज भारताच्या प्रत्येक प्रातांत समोसा हा प्रकार मिळतो. जाणून घ्या याबद्दल काही गमतीजमती:
 
दिल्लीत मुघलांचं राज्य असताना समोसा हा प्रकार भारतता आला. साधरणपणे तेराव्या शतकात इराणमधल्या आचार्‍यांनी तो तयार केला असावा.
 
इ. स. 1300 च्या सुमारास कवी आमीर खुसरोनं समोसा या खाद्यपदार्थाचा उल्लेख केलेला आढळतो.
 
इराणमधले इतिहासकार अबुल फजल बेहकीनं दहाव्या शतकातल्या आपल्या पुस्तकात समोसा या खाद्यपदार्थाचा उल्लेख केल्याचं आढळतं. यावरून समोसा हा प्रकार किती जुना आहे हे आपल्या लक्षात येईल.
 
1495 मध्ये भारतात खाद्यपदार्थांच एक हस्तलिखित लिहिलं गेलं. यात समोशाची रेसिपी देण्यात आली आहे. या समोशाचं एक चित्रही आहे.
 
अरबी कवी इशाक इब्न इब्राहिम यांनही आपल्या कवितांमधून सेनबोसागचं वर्णन केलं आहे. सेनबोसागच्या चवीची वर्णनं अनेक ठिकाणी आढळतात.
 
इब्न बतूतानंही समोशाचा उल्लेख केला आहे.
 
कझाकिस्तान या देशातही समोसा हा खाद्यप्रकार प्रसिद्ध आहे. येथे आला सोम्सा असं म्हणतात. कझाकिस्तानमधल्या समोशात भोपाळा आणि मास घातलं जातं.
 
आफ्रिकेतल्या देशांमध्ये या पदार्थाला संबोसा असं म्हटलं जातं आणि सणसमारंभाला तो तया केला जातो.
 
तर असा हा समोसा पार इराणमधून आपल्याकडे आला आणि भारतीयच बनून गेला.