रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 एप्रिल 2018 (15:34 IST)

दुसर्‍यांचे जोडे चपला आणि या 3 वस्तूंचे वापर करू नये

दैनिक जीवनात बर्‍याच वस्तूंचे वापर करतो आणि ह्या वस्तू आमच्यावर शुभ अशुभ प्रभाव टाकतात. जास्त करून लोक आपल्या मित्रांची आणि नातेवाइकांच्या वस्तूंचा वापर करतात. ज्योतिष आणि वास्तूनुसार दुसर्‍यांच्या काही वस्तू सांगण्यात आल्या आहे, ज्यांचा वापर करणे अशुभ मानण्यात आले आहे. जर एखादा व्यक्ती दुसर्‍यांच्या या वस्तूंचे वापर करतो तर त्याच्या जीवनात त्रास वाढू शकतो. जाणून घ्या त्या वस्तू ...
 
पहिली वस्तू जोडे चपला  
ज्योतिषीनुसार आमच्या पायात शनी देवाचा वास असतो आणि याच कारणांमुळे जोडे चपला शनीशी संबंधित असतात. जर आम्ही दुसर्‍यांचे जोडे चपला सारखे सारखे वापरले तर पत्रिकेतील शनी अशुभ परिणाम देऊ शकतो.  
 
दुसरी वस्तू आहे टॉवेल
जास्त करून लोक दुसर्‍यांच्या टॉवेलचा वापर करतात. वास्तू आणि ज्योतिषीनुसार ही सवय तुमचा त्रास वाढवू शकते. दुसर्‍यांचा टॉवेल यूज केल्याने त्याची नकारात्मकता आमच्यावर हावी होऊ शकते. त्याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला त्वचा संबंधित आजार असेल आणि त्याचा टॉवेल आम्ही वापरला तर तो आजार आम्हाला देखील होऊ शकतो.  
 
तिसरी वस्तू आहे तेल
काही लोक जेव्हा घराबाहेर जातात तर केसांमध्ये लावायला दुसर्‍यांच्या तेलाचा वापर करतात. या कारणामुळे शनी दोष वाढू शकतो. तेल शनीशी निगडित आहे. म्हणून दुसर्‍यांच्या तेलाचे वापर करणे टाळावे.  
 
चवथी वस्तू आहे रत्न
ज्योतिषात रत्नांना फार महत्त्व देण्यात आले आहे. रत्न धारण केल्याने ग्रहांचे दोष कमी होण्यास मदत मिळते, पण चुकीचे रत्न धारण केल्याने ग्रह दोष वाढू शकतो. जर दुसर्‍यांचे रत्न धारण कराल तर कदाचित ते तुमच्यासाठी शुभ ठरणार नाही. म्हणून एखाद्या ज्योतिषीला विचारूनच कुठलाही रत्न धारण करायला पाहिजे.