शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तूप्रमाणे झोपण्याचे 5 नियम

शास्त्राप्रमाणे झोपण्याचेही काही नियम आहे. या नियमांप्रमाणे झोप घेतली तर शरीराला पूर्ण आराम मिळतो आणि मन प्रसन्न राहतं...

1. सदैव पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे डोके ठेवून झोपले पाहिजे. उत्तर किंवा पश्चिमीकडे डोके ठेवून झोपणे योग्य नाही.
2. पूर्वीकडे डोके करून झोपण्याने बुद्धी तीक्ष्ण होते. दक्षिणीकडे डोके करून झोपल्याने वय वाढतं. पश्चिमीकडे डोके करून झोपण्याने मानसिक विकार होतो. उत्तर दिशेकडे डोके करून झोपण्याने हानी होते आणि वय कमी होतं.

3. बांबू किंवा पलाशच्या लाकडाने बनलेल्या पलंगावर झोपू नये. डोके खालील बाजूला लटकवून झोपणेही योग्य नाही. 
 
4. झोपण्यापूर्वी कपाळावरून टिळा आणि केसातून फुलं काढायला हवे.
5. दिवसा झोपू नये, दिवसा झोपल्यामुळे रोग उत्पन्न होतात.