शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तू टिप्स: घरातील खिडकी आणि दार देखिल तुमच्या खिशावर टाकतात प्रभाव

घर किंवा दुकानात लागलेल्या खिडक्या दार देखील तुमच्या खिशावर प्रभाव टाकतात. अर्थात दार आणि खिडक्या चुकीच्या दिशेत लावल्याने आणि त्यांचे चुकीच्या दिशेत उघडणे किंवा बंद झाल्याने धनलक्ष्मी नाराज होते. या कारणामुळे घरातील खिडकी आणि दाराला लावताना काही गोष्टींकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्ही वास्तुदोषापासून स्वत:चा बचाव करू शकता आणि लक्ष्मीला देखील खूश ठेवू शकता.
 
जसे घर, दुकान किंवा कार्यस्थळावर खिडकी आणि दार सम संख्येत असायला पाहिजे. तसेच ते आतल्या बाजूने उघडायला पाहिजे. वास्तू शास्त्रात  दोष युक्त खिडकी किंवा दार असल्याने त्यांचे दोष समाप्त करण्याचे देखील उपाय सांगण्यात आले आहे.
 
जाणून घ्या खिडकी दाराशी निगडित वास्तूच्या कामाच्या काही गोष्टी
 
- घर किंवा दुकानाचे मेन गेट पूर्व किंवा उत्तर दिशेत असणे फारच उत्तम असत, पण असे नसल्यास घराच्या मेन गेटवर स्वस्तिक किंवा   श्रीगणेशाचे चिन्ह लावायला पाहिजे.
- घराच्या मेन गेटवर तुळशीचा पौधा ठेवायला पाहिजे. पहाटे पहाटे तुळशीला जल चढवायला पाहिजे. सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावायला पाहिजे. पूर्व किंवा उत्तर दिशेत तुळस लावल्याने आत्मविश्वास तर वाढतोच तसेच धनलाभ देखील होतो.
- घर किंवा दुकानात खिडकी आणि दारांची संख्या सम होणे शुभ मानले जातात. अर्थात 2, 4, 6, 8 किंवा 10 असायला पाहिजे.
- संख्या सम न असल्याने खिडकी किंवा दाराचा वापर करणे बंद करून तेथे पडदे लावू शकता.
- घरातील दार आणि खिडक्या आतल्या बाजूला उघडणारे असतील तर उत्तम.
- शक्य असल्यास रोज किंवा आठवड्यातून एक दिवस मेन गेटवर अशोकच्या पानांचे तोरण बांधायला पाहिजे.