रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

घरामध्ये चप्पल, बूट घालू नये

आजकाल अनेकजण घरात स्लीपर्स किंवा जोडे घालूनच वावरताना दिसतात. प्राचीन काळापासून आपल्याकडे घरी पादत्राणे वापरू नका असे सांगण्यात आल्याचे दिसते. स्वत:ला पुढारलेले समजणारे प्रामुख्यने घरात चपला वापरताना दिसतात, हे आश्चर्यच आहे.

असो. घरात चपला घालून वावरू नये कारण आपण बाहेरून घरात येतो तेव्हा आपल्या चपलांबसोबत घाणही येते. असे असताना आपण घरात चपला घालून येण्याने घरातही घार पसरते. असे होणे घरातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ठीक नसते. या घाणीत रोगराई पसरवू शकणारे जंतू असू शकतात. यामुळे घरात चप्पल घालून फिरणे योग्य नाही. याशिवाय यामागे धार्मिक कारणही आहेच. घर म्हणजे देवी देवतांचे स्तान मानले गेले आहे. आपण राहतो तेथे दैवी शक्तीचाही वास असतो. असे असताना घरात चपला घालून फिरणे म्हणजे देवतांचा अपमान तर आहेच, शिवाय आपण घराचे पावित्र्यही घालवून बसतो. ज्या घरात पावित्र्य असते तिथे स्थायी रूपाने देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे घराचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे. घरात बिना पादत्राणे राहिल्याने त्यानिमित्ताने पायातील अनेक महत्त्वाच्या बिंदूवर दाब पडतो आणि यामुळे अनेक रोग दूर होतात.