गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जुलै 2018 (14:44 IST)

अहमदाबादचे जगन्नाथ मंदिर

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील भगवान जगन्नाथाचे मंदिर अल्पावधीतच त्याच्या भव्यता व सुंदरतने नटलेल्या रूपाने लोकप्रिय झाले आहे. जमालपूर परिसरात असलेले प्राचीन जगन्नाथाचे मंदिर अहमदाबादसह परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान मानले जात आहे. 
 
मंदिराच्या निर्मितीच्या बाबतीत येथे सांगितले जाते की, 150 वर्षांपूर्वी भगवान जगन्नाथ हे महंत नरसिंहदासजी यांच्या स्वप्नात येऊन त्यांना आदेश दिला की, जमालपूर येथे त्यांचे बंधू बलदेव व भगिनी सुभद्रा यांच्यासोबत त्यांचे भव्य मंदिर उभारण्यात यावे. त्यानंतर नरसिंहदासजी यांनी मंदिराच्या स्थापने विषयी ग्रामस्थासमोर प्रस्ताव ठेवला व त्यांनी प्रस्तावाचे स्वागत केले. मोठ्या धूमधाममध्ये भक्तिमय वातावरणात भगवान जगन्नाथाची प्राण-प्रतिष्ठा करण्यात आली.
 
भगवान जगन्नाथाच्या स्थापनेनंतर सारा परिसर खुलून गेला. येथे भगवान जगन्नाथ, बलभद्रजी व देवी सुभद्रा यांच्या आकर्षक प्रतिमा येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे मन मोहून टाकतात. 1878 पासून आषाढ शुद्ध पौर्णिमेला निघणारी रथोत्सव येथील परंपरेचा भाग झाला आहे. रथोत्सवाच्या दरम्यान मंदिर मोठ्याप्रमाणात सजविण्यात येते. तसेच रथोत्सवात सहभागी झालेले भक्त स्वत: ला भाग्यशाली मानतात.
'जय रणछोड', 'जय माखन चोर' च्या जयघोष करत भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी येथे भारतातील कान्याकोपऱ्यातील भाविक येतात. येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली जाते. येथे येणाऱ्या श्रद्धाळू भक्तांच्या मते भगवान जगन्नाथाच्या दर्शनाने त्यांच्या सर्व इच्छा- आकांक्षा पूर्ण होतात.
 
महामंडलेश्वर महंत नरसिंहदासजी महाराज यांच्या वतीने 'भुंके को भोजन' या माध्यमातून प्रतिदिन हजारो गरीब, दरिद्रीनारायण व गरजू नागरिक येथे श्रुधाशांती करतात.
 
कसे पोहचाल?
 
विमान सेवा- अहमदाबाद विमानतळ देशातील प्रमुख विमानतळाशी जुडलेला आहे. येथून खाजगी वाहन सहज उपलब्ध होते.
 
रेल्वे मार्ग- अहमदाबाद येथे रेल्वेचे जंग्शन स्टेशन असून देशातील लहान मोठ्या रेल्वे लाइनद्वारा जुडलेले आहे. कालुपूर स्टेशनपासून मंदिर अवघ्या तीन किमी. अंतरावर आहे. मणिनगर व साबरमती रेल्वे स्टेशनहून देखील मंदिरापर्यंत जाण्यासाठी खाजगी वाहन सहज उपलब्ध होते.
 
महामार्ग:- सर्व राज्यातून अहमदाबाद येथे येण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे. येथील गीतामंदिर बस स्थानकावरून खाजगी वाहनातून मंदिरापर्यंत जाण्यासाठी सहज वाहन मिळते.