सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

या राशीच्या लोकांना होऊ शकतात हे आजार

ज्योतिष शास्त्र ग्रंथांमध्ये कालरूपी पुरुषाच्या शरीराच्या विभिन्न अंगांमध्ये मेष ते मीन पर्यंत बारा राशींची स्थापना करण्यात आली आहे ज्या आधारावर त्याचे अंग रोगग्रस्त किंवा स्वस्थ आहे, हे माहीत पडू शकतं.
 
ज्योतिष शास्त्र मान्यतेनुसार मेष राशी- डोके, वृषभ- मुख, मिथुन- आर्म्स, कर्क- हृदय, सिंह- पोट, कन्या- कंबर, तूळ- वस्ति, वृश्चिक- गुप्तांग, धनू- उरू, मकर- गुडघे, कुंभ- मांड्या आणि मीन राशी पायांचे प्रतिनिधित्व करते.
12 राश्या जे रोग उत्पन्न करते त्या या प्रकारे आहे-
मेष- नेत्र रोग, मुख रोग, डोकेदुखी, मानसिक ताण, निद्रानाश
वृषभ- घसा आणि श्वसन रोग, डोळे, नाक आणि घशाचे रोग  
मिथुन- रक्त विकार, श्वास, फुफ्फुस रोग
कर्क- हृदयरोग आणि रक्त विकार
सिंह- पोटातील रोग आणि वायू विकार
कन्या- जठरासंबंधी बंडाळी, अपचन, यकृत आणि मांडीचा सांधा दुखणे
तूळ- मूत्राशय रोग, मधुमेह, प्रदर व बहुमूत्र
वृश्चिक- गुप्त रोग, भगन्दर, संसर्गजन्य रोग
धनू-  मज्जा रोग, रक्त दोष, फ्रॅक्चर
मकर- संधिवात, त्वचा रोग, शीत रोग, ब्लड प्रेशर
कुंभ- मा‍नसिक रोग, लचक, उष्णता, एस्कीट्स
मीन- अॅलर्जी, संधिवात, त्वचा रोग व रक्त विकार