पूजा करताना हे पाच लोक सोबत नसावे, नकारात्मक असतात असे लोक
पूजा करताना मन कसं शांत असायला हवं, अशात असे 5 लोकं आहे ज्यांना पूजा करताना किंवा मंदिरात जाताना सोबत घेऊ नये कारण आमच्यावर त्या लोकांच्या नकारात्मकतेचा प्रभाव पडतो आणि आपली देवपूजा अपुरी राहते. जाणून घ्या असे लोकं ज्यांच्याशी दुरी ठेवणे योग्य ठरेल.
निंदक
सतत दुसर्यांमध्ये खोट बघणारे, सतत दुसर्यांची टिंगल करणारे, आपण श्रेष्ठ व इतर अगदी मूर्ख अशी समजूत असलेल्या लोकांशी दूर राहणेच योग्य. अश्या व्यक्तीच्या मनात सतत दुसर्यांप्रती द्वेष असतो आणि त्यामुळे या लोकांभोवती नकारात्मकता पसरलेली असते.
नास्तिक
नास्तिक लोक देवाधर्माला मानत नाही आणि आस्तिक लोकांच्या मनातही ते सतत याबद्दल काही न काही तर्क-वितर्क सुरू ठेवतात. म्हणून ज्यांना देवाप्रती आस्था आणि आदर नाही त्यांना आपल्या पूजेत किंवा मंदिरात जात असताना सामील करणे म्हणजे नकारात्मकता वाढण्यासारखे आहे.
लोभी
लोभी प्रवृत्ती, म्हणजे सतत दुसर्यांकडून मिळणार्या फायद्याची गोष्ट करणारे लोक चुकीचे असतात. स्वत:कडे असले तरी दुसर्यांच्या वस्तूंवर डोळा असणार्यांना लोकांना देवाची आराधना करताना सोबत घेऊ नये.
वाईट नजर
दुसर्यांचे भलं पाहवत नाही असे जगात अनेक लोकं आहेत. अशा लोकांची दुसर्यांवर द्वेष भावना असते. दुसर्यांच्या यशावर जळणे, त्यांचं वाईट व्हावं असा विचार करणे किंवा त्यासाठी काही छळ करणार्यांना लोकांपासून दूर राहावे.
रागीट
क्रोध करणार्या व्यक्तीची मानसिक स्थिती अत्यंत गडबडलेली असते. अशांत मन आणि स्वभावामुळे असे लोकं सतत नकारात्मकतेच्या आवरणात वावरतात. अश्या तापट स्वभावाच्या व्यक्तीसोबत देव पूजा केल्यास इच्छित शांती आणि सकारात्मकता कुठून येणार.