सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (09:15 IST)

कृष्णजन्माच्या दिवशीच कृष्ण मंदिरात चोरी, सुमारे 35 लाखांची चोरी

कृष्णजन्माच्या दिवशीच कृष्ण मंदिरात चोरी झाल्याची घटना ठाण्यातील जांभळीनाका भागात घडली. या मंदिरातून दानपेटीतील रोख रक्कम आणि सोन्याचा ऐवज अशी एकूण सुमारे 35 लाखांची चोरी झाली आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना चोरट्यांची ओळख पटली असून लवकरच अटक होणार आहे.  
 
जांभळीनाका भागातील मुख्य बाजारपेठेच्या परिसरात वैष्णव समाजाचे गोवर्धन वैष्णव मंदिर हवेली हे कृष्णाचे 60 ते 70 वर्षे जुने मंदीर आहे. पहाटे या मंदिराच्या मागच्या बाजूने चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून कृष्ण मूर्तीला अर्पण करण्यात आलेले सोन्याचे दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण 35 लाख किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवून पोबारा केला. या मंदिराच्या पुजार्‍याने रविवारी सकाळी मंदिर उघडल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांचा तपास सुरू असून सीसीटीव्हीत एक चोरटा कैद झाला असल्याची माहिती एका पोलीस अधिकार्‍याने दिली.मंदिरात चोरी करणारे चोरटे पोलिसांच्या रडावर आहेत.