शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 सप्टेंबर 2018 (09:43 IST)

‘लवासा’दिवाळखोरीकडे, सामान्य गुंतवणूकदार हवालदिल

हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी (एचसीसी) प्रवर्तित ‘लवासा’हा प्रतिष्ठित प्रकल्प आता दिवाळखोर ठरण्याच्या वाटेवर असून त्याबाबत राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर सुनावणी सुरू होत आहे. लवासाला पतपुरवठा करणाऱ्या काहींनी लवासाला कर्जबाजारी ठरवण्याबाबत राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर याचिका केली होती. ती लवादाने दाखल करून घेतल्याचे ‘एचसीसी’ने मुंबई शेअर बाजाराला कळवले आहे. दुसरीकडे हा प्रकल्प दिवाळखोर म्हणून घोषित होण्याच्या वाटेवर असल्याने सामान्य गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. 
 
‘लवासा’मध्ये हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचा सर्वाधिक म्हणजे ६८.७ टक्के भांडवली वाटा आहे. त्याचबरोबर अवंता ग्रुपचा १७.१८ टक्के, वेंकटेश्वर हॅचरिजचा ७.८१ टक्के आणि विठ्ठल मणियार यांचा ६.२९ टक्के वाटा आहे.