रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 ऑगस्ट 2018 (09:02 IST)

गायीच्या पोटावर शस्त्रक्रीया, 50 किलोचा प्लॉस्टीक कचरा काढला

परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशु शल्यचिकित्सा रुग्णालयात गायीच्या पोटावर शस्त्रक्रीया करुन पोटातील 50 किलोचा प्लॉस्टीक कचरा बाहेर काढला. यामध्ये पोटात असलेले चप्पल, वाळू, दोन रुपयांचे दोन नाणे, एक खिळा, दोन तार, सेफ्टीपीन, गीट्टी, मोठादोर, अनेक कॅरीबॅगा आदी वस्तुही बाहेर काढले आहेत. डॉ.गजानन ढगे व त्यांच्या सहकार्यांनी मागील तीन वर्षात प्रथमच इतकी मोठी शस्त्रक्रीया गायीच्या पोटावर यशस्वीपणे केली.
 
प्रगतीशील शेतकरी राधाकिशन वाघमारे यांच्या मालकीच्या लालकंधारी जातीच्या गायीवर ही शस्त्रक्रीया झाली. पंधरा दिवसांपूर्वीच एका छानस्या गोऱ्याला जन्म दिल्यानंतर या गायीने दूध देणे बंद केले होते. गाय सुस्त झाली होती. तिच्या पोटात बद्धकोष्ठता झाली होती. बहुदा पोटात पोटसूळ उठल्याने तिला वेदना होत असल्याने ती दात खात होती. यामुळे राधाकिशन वाघमारे यांनी तातडीने या गायीला पशुचिकित्सा रुग्णालयात दाखल केले होते.