शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 जून 2018 (15:14 IST)

माऊंट एव्हरेस्टवर कचऱ्याचे साम्राज्य

माऊंट एव्हरेस्टवर आणि त्याच्या मार्गावर गिर्यारोहकांची संख्या वाढत असल्याने कचराही वाढत चालला आहे. यात गिर्यारोहकांनी वापरलेले फ्लुरोसेंट टेंट, निकामी गिर्यारोहणाची उपकरणे, रिकामे ऑक्सिजन कॅनिस्टर, इतकेच नव्हे तर तेथे मानवाने केलेले शौच यामुळे तेथील कचऱ्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. याबाबत तब्बल १८ वेळा माऊंट एव्हरेस्ट सर केलेले पेम्बा दोरजे शेरपा यांनी सांगितले आहे. यंदा ६००हून अधिक लोकांनी माऊंट एव्हरेस्टवर चढाई केली आहे.
 
पाच वर्षांपूर्वी नेपाळ सरकारने गिर्यारोहकांच्या प्रत्येक पथकाला ४००० डॉलर्स डिपॉझिट ठेवण्याची सक्ती केली होती. प्रत्येक गिर्यारोहकाने किमान ८ किलो कचरा शिखरावरून खाली आणल्यास डिपॉझिट परत केले जाणार होते, तर तिबेटमधून माऊंट एव्हरेस्टवर गेले, तर ८ किलो कचरा खाली आणण्याचे बंधन घातले आहे. जर कचरा आणला नाही, तर प्रतिकिलो मागे १०० डॉलर्स दंड आकारला जातो.
 
सागरमाथा प्रदूषण नियंत्रण समितीच्या माहितीनुसार नेपाळच्या गिर्यारोहकांनी २०१७ मध्ये २५ किलो कचरा आणि १५ टन मानवी मल शिखरावरून खाली आणला होता. या शिखरावरील कचरा कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात बायोवेस्ट प्रकल्प उभारण्याचा समावेश आहे.