शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जानेवारी 2024 (14:40 IST)

7 जानेवारीला बुध करणार धनू राशीत प्रवेश, 3 राशीच्या जातकांना अफाट पैसा मिळेल

budh in kanya
Budh Gochar 2024 Effects वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा ग्रह राशी परिवर्तन होतं तेव्हा 12 राशींच्या जातकांवर शुभ - अशुभ प्रभाव पडतो. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 7 जानेवारीला बुध धनू राशीत गोचर करणार ज्याने सर्व 12 राशींवर शुभ - अशुभ प्रभाव पडेल.
 
बुधाचे गोचर सर्व 12 राशींसाठी खास असणार असल्याचे सांगितले जात आहे. या तीन राशींच्या जातकांना शुभ संकेत मिळू शकतात.
 
कन्या - वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 7 जानेवारी 2024 रोजी बुध धनू राशीत गोचर करत असल्याने कन्या राशीच्या जातकांना शुभ फल प्राप्ती होणार. या लोकांच्या करिअरमध्ये प्रचंड वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून अचानक धनलाभ होईल. व्यवसायात संपत्तीचा विस्तार होईल जे तुम्हाला आनंद देईल. आईच्या तब्येतीची समस्या असू शकते, अशात काळजी घ्या.
 
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण खूप खास असणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. मन उत्साहाने भरून जाईल. तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाकडून काही महागडे गिफ्ट मिळू शकते. तुम्हाला तुमच्या आहाराची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते. बुधाच्या संक्रमणामुळे प्रलंबित कामे अचानक पूर्ण होऊ शकतात.
 
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी बुधाचे गोचर खूप खास असणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला भरपूर प्रेम मिळेल. कार्यक्षेत्रात विस्तार होईल. व्यवसायासाठी बाहेर जाण्याची योजना आखू शकता. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटू शकता. एकूणच जातकांना फक्त फायदे मिळतील.