1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (00:23 IST)

कुशाग्र बुद्धी मिळवण्यासाठी बुध मंत्राचा जप करा

budh mantra jap
बुद्धी आणि शक्ती मिळविण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी आदर्श जीवनशैलीची आवश्यकता असते. संतुलित आहाराचीही गरज असते. यासोबतच काही आध्यात्मिक उपाय करणेही लाभदायक असल्याचे सिद्ध झाले आहे. मंत्रांमध्ये मानसिक एकाग्रता आणि ऊर्जेची शक्ती असते.
 
हिंदू धर्मशास्त्रात बुध या ग्रहाला बुद्धीचा कारक ग्रह मानण्यात आले आहे. त्यामुळेचे बुद्धीदाता गणेश भक्तीसाठी चतुर्थी आणि बुधवारला विशेष महत्त्व आहे. बुध ग्रहाच्या मंत्राचा जप करणे महत्त्वाचे मानण्यात आले आहे.
 
बुद्धीला कुशग्र करण्यासाठी अदभुत परंतु अतिशय सोपा बुध मंत्र व पूजा विधी पुढीलप्रमाणे...
 
चतुर्थी किंवा बुधवारी श्रीगणेश किंवा नवग्रह मंदिरात बुध किंवा गणेश प्रतिमेची गंध, फूले यांची पूजा करा. पिवळे वस्त्र, मिठाईचे भोग चढवून पूजा करा. धूप आणि दीप जाळा. पिवळया आसनावर बसून खालील बुध मंत्राचा 108 वेळा चंदन किंवा हळदीच्या माळेने जप करा.
 
ओम बुधाय नम:
 
ओम दुर्बुद्धिनाशनाय नम:
 
ओम सुबुद्धिप्रदाय नम:
 
ओम सौम्यग्रहाय नम: 
 
ओम सर्वसौख्यप्रदाय नम: 
 
ओम सोमात्मजाय नम:
 
मंत्र जप झाल्यानंतर बुध व श्रीगणेशाची दीप आरतीने पूजा करा.