शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (09:40 IST)

वारांनुसार आपल्या कपड्यांचे रंग निवडा

प्रत्येक रंगाचं आपलं एक विशेष महत्त्व आहे. रंग व्यक्तिमत्त्व दर्शवतात, आनंदी बनवतात, मनाचा भाव दर्शवतात. अनेक रोग रंगाने बरे केले जाते. ज्यांना आपण रंग चिकित्सा किंवा कलर थेरेपी असे ही म्हणतो. तर मग खरंच का रंग आपल्या नशिबाला घडविण्यात काही भूमिका बजावतात ? 
 
जे लोक याचा वर विश्वास ठेवतात त्याचे उत्तर होकारार्थीच असणार! दिवसानुसार रंगाची निवड करणं फायद्याचे असतं. 
 
* रविवार - 
रविवार हा सूर्यदेवाचा, तेजाचा, ऊर्जेचा दिवस आहे, म्हणून या दिवशी लाल, गडद पिवळा, सोनेरी, संत्री आणि गुलाबी रंग आपल्याला विशेष ऊर्जा देतात. या दिवशी नवीन कपडे घालत नाही पण रंगीत किंवा रंग बेरंगी कपडे घातल्यानं स्वतःला ताजेतवाने आणि उत्साहित अनुभवता.
 
* सोमवार - 
सोमवार हा चंद्राचा दिवस आहे. या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. या दिवशी आपण देखील फिकट रंगाचे कपडे घालू शकता. पण या दिवशी पांढरे कपडे घालणं देखील शुभ असतं. म्हणून दिवसाला यशस्वी आणि तेजस्वी बनविण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही रंग निवडू नका. तरच चांगले असणार आणि गडद रंगाला तर या दिवशी पूर्णपणे विसरूनच जा. 
 
* मंगळवार - 
मंगळवार हा मारुतीचा वार आहे. म्हणून या दिवशी लाल, नारंगी, गडद तपकिरी आणि चॉकलेटचा रंग उपयुक्त असतो. या दिवसाचा ग्रह मंगल आहे. म्हणून म्हरून रंग देखील खूप महत्त्वाचे आहे. या दिवशी हे रंग घातल्याने आपल्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळंच आकर्षण निर्माण होतं आणि आपल्या गोष्टींचा समोरच्या वर सखोल परिणाम होतो. 
 
* बुधवार - 
हा दिवस गणपतीचा असतो, गणपतींना दुर्वा अधिक प्रिय आहे. या दिवशी हिरव्या रंगाचे विशेष महत्त्व आहे. हिरवा रंग बुध ग्रहाचा असतो. म्हणून या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घालणं विशेषतः फलदायी असतं. या मुळे व्यवसायात, नोकरीत अनुकूल वातावरण तयार होतं. या दिवशी पांढरा रंग देखील घालू शकता. 
 
* गुरुवार - 
गुरुवार हा गुरुदेव बृहस्पतींचा आहे. बृहस्पती देवांना पिवळा रंग फार आवडीचा आहे. हे मान- सन्मानाचे देव देखील मानले जातात. म्हणून या दिवशी  पिवळा आणि सोनेरी रंग वापरणे अत्यंत उत्तम मानतात. या शिवाय गुलाबी, नारंगी देखील उत्तम मानले गेले आहेत. पण पिवळे आणि सोनेरी रंगाचे कपडे घातल्यानं हा दिवस आपल्यासाठीच असणार.
 
* शुक्रवार - 
हा आई दुर्गेचा दिवस आहे. या दिवशी नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडेच घालावे. या दिवशी रंगीत, प्रिंटेड कपडे घातल्यानं शरीरात चपळता आणि ऊर्जेचा प्रवाह होताना जाणवतो. या दिवशी फिकट लाल, गुलाबी, केशरी रंग, चौकड्याचे, धारी किंवा लाइन बनलेले कपडे घातल्यानं हे प्रत्येक क्षेत्रात फायदे देतात.
 
* शनिवार -
शनिवारचे आराध्य देव न्यायमूर्ती शनी महाराज आहे. शनिदेवांना काळा, निळा, गडद जांभळा आणि जांभळा रंग आवडतो. म्हणून या दिवशी या रंगाचे कपडे घातल्यानं शनी देवांची कृपा आपल्यावर राहते. हे गडद रंगाचे कपडे घातल्यानं माणसामध्ये आत्मविश्वास आणि संकल्प शक्तीची भावना प्रबळ होते. म्हणून आपण या दिवशी हे गडद रंग घालणं सुरू करा विश्वास ठेवा की आपण ज्या क्षेत्रात काम करत आहात आपण आपली छाप सोडण्यात यशस्वी व्हाल.