शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2022 (22:32 IST)

ज्योतिषशास्त्राप्रमाणे सुख व समृद्धीसाठी हे उपाय करा!

astrology
ज्योतिषशास्त्रात मनुष्याला जीवनात सुख व समृद्धी मिळावी यासाठी बरेचसे उपाय सांगितले आहेत.
 
सूर्य दर्शनानंतर सूर्याला पाणी, पुष्प आण अक्षतांचे अर्घ्य द्यावे.
 
झोपेतून उठल्यावर दोन्ही पाय जमिनीवर एकाच वेळेच ठेवायला पाहिजे आणि त्यात वेळेस आपल्या इष्ट देवाची आराधना करून आपल्या हातांना तोंडावरून फिरवायला पाहिजे.
 
अंघोळ व पूजा पहाटेच आटोपून घ्यावी.
 
घरातील तुळशीची नित्यनेमाने सेवा करावी.
 
पितृदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी रोज पक्ष्यांना दाणा आणि पाणी द्यावे.
 
शनिवारी व आमावस्यांच्या दिवशी संपूर्ण घराची स्वच्छता करून घरातील पसारा बाहेर काढून जोडे-चपलांचे दान करावे. जेवढे जमेल तेवढे भाची-भाच्यांना भेटवस्तू द्यावी.
 
घरात जेवण तयार करताना गाय आणि कुत्र्याचा भाग जरूर वेगळा काढावा. याने पितृदोष नाहीसे होतात. बुधवारी कुणालाही उधार देऊ नये, ते पैसे परत मिळणे अशक्य असते.