शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 17 मार्च 2021 (14:41 IST)

ही स्वप्ने खूप खास आहेत, त्यांची चिन्हे आणि महत्त्व जाणून घ्या

व्यक्ती रात्री झोपेत स्वप्ने पाहतातच असे नाही पण् काही स्वप्ने अशी असतात जी  आपल्याला झोपू देत नाहीत. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे हे विधान आपण बर्याअच वेळा ऐकतो जे खूप प्रेरणादायक कल्पना आहे परंतु आपणास माहित आहे की आपण जे स्वप्न पाहतो ते देखील आपल्या भविष्यातील घटनांचे सूचक आहे.
 
चला, आज आपण त्या स्वप्नांमध्ये दिसणार्या गोष्टींबद्दल बोलु ज्यामुळे आपण बहुतेकदा आनंदी, दु:खी किंवा घाबरत असतो.
 
आकाशाकडे जाणे - लांबचा प्रवास
जर एखादी व्यक्ती स्वत: ला हेलिकॉप्टरमध्ये बसलेली दिसली तर हे स्वप्न त्याला असे सूचित करते की तो लांबच्या प्रवासाला जाणार आहे.
 
सूर्य दिसणे - महात्माचे दर्शन
जर एखाद्या व्यक्तीला दररोज एखाद्या स्वप्नात असे दिसते की तो सूर्याकडे पहात आहे, तर त्याला महात्माचे दर्शन होणार आहे असे सूचित केले गेले आहे.
 
ढगाकडे बघणे – प्रगती  
लहानपणी जेव्हा आपण हेलिकॉप्टर वरून जाताना बघत असतो तेव्हा आम्ही आकाशाकडे पाहत हेलिकॉप्टरला बाय बाय असे म्हणत होते आणि जर आपल्या स्वप्नांमध्ये ढग दिसले तर याचा अर्थ असा की आपण लवकरच प्रगती करणार आहात.
 
घोडा चढणे - व्यवसाय उन्नती
आम्ही हे बर्याढचदा वराला घोड्यावरुन वधूच्या घरी जात असतांना बघत असतो, परंतु आपण आपल्या स्वप्नांमध्ये स्वतःला घोड्यावर चढताना पाहिले तर हे आपल्या व्यवसायातील वाढीचे लक्षण आहे.
 
आरशात स्वत:ला पाहणे - स्त्रीवर प्रेम  
सहसा आपण स्वतःला दररोज आरश्यात बघतो, परंतु जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात स्वत:स आरश्यात पाहिले तर त्याचा अर्थ असा आहे की तो एका स्त्रीच्या प्रेमात पडणार आहे.
 
उंचावरून पडणे - तोटा
चित्रपटात आपण बर्यावचदा नायक उंचीवरून उडी मारताना पाहतो, पण जर आपण स्वत: ला उंचवरून खाली पडताना पाहिले तर हे नुकसान होण्याचे चिन्ह आहे.
 
बाग - फुलवारी पहाणे - आनंद
बागांमधिल फुले तोडणे सामान्य आहे, परंतु जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात बाग दिसली तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात आनंद येईल.
 
डोक्याचे केस कापलेले पाहणे - कर्जातून मुक्त होणे  
डोक्याचे केस कापणे सामान्य गोष्ट आहे, परंतु जर आपण स्वत: ला स्वप्नात आपले केस कापताना पाहिले तर आपण कर्जातून मुक्त व्हाल याचे द्योतक आहे.
 
शौच करणे – धन प्राप्ती  
आम्ही दररोज शौच करतो, पण स्वप्नांमध्ये करताना हे थोडे   घाणेरडे  वाटेल परंतु त्याचे स्वप्न पाहणे हे आपल्याला संपत्ती मिळण्याचे चिन्ह आहे
 
फूल पाहणे – प्रियकराची भेट  
सतत गुलाबाचे फूल पाहणे म्हणजे मोठ्या आनंदाची भावना असते, जर आपण आपल्या स्वप्नात फूल पाहिले तर हे  लवकरच आपण आपल्या प्रियकराला भेटायला जाण्याचे 
 
लक्षण आहे.