मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 (08:14 IST)

Shani Amavasya 2023: शनी अमावस्येला सूर्य ग्रहण, शनी देव 4 राशींवर कृपा बरसणार

Shani Amavasya 2023
Shani Amavasya 2023: जेव्हा अमावस्येचा संयोग शनिवारी पडतो तेव्हा त्याला शनी अमावस्या म्हणतात. ज्योतिष शास्त्राप्रमाणे या वर्षी शनिश्चरी अमावस्येला सूर्य ग्रहण आहे. शनी अमावस्या यंदा 14 ऑक्टोबर रोजी आहे. तर अनेकाप्रकारे ही अमावस्या शुभ असल्याचे सांगितले जात आहे. ज्योतिषिय गणनेप्रमाणे शनी अमावस्येला लागणारे सूर्य ग्रहण 4 राशी संबंधित जातकांसाठी खूप शुभ आणि फायद्याचे सांगितले जात आहे.
 
वृषभ
ज्योतिषीय गणनेप्रमाणे शनि अमावस्या वृषभ राशीसाठी शुभ ठरणार आहे. यादिवशी वृषभ राशीवर शनी देवाची कृपा दृष्टी राहील. या प्रभावाने या राशीच्या लोकांना नोकरीत बढतीचा लाभ मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद आणि आनंद राहील. शनिदेवाच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात भरपूर फायदा होईल.
 
मिथुन
ज्योतिषीय गणनेनुसार शनि अमावस्येच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असेल. या काळात तुम्हाला नोकरीत बढतीची चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. प्रवासातून आर्थिक लाभ होईल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. वैवाहिक जीवनात शांतता आणि सौहार्द राहील. यासोबतच या दिवशी गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो.
 
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी शनी अमावस्या वरदानापेक्षा कमी नाही. वास्तविक शनि अमावस्येच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांना शनिदेवाची विशेष कृपा लाभेल. शनिदेव तुमच्या चांगल्या कर्माने प्रसन्न होऊन तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकतात. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांनाही शनिदेवाच्या आशीर्वादाने चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्न आणि खर्चाचा समतोल राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. गुंतवणुकीतून तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क मिळू शकतो.
 
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनि अमावस्येचा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी कुंभ राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळेल. शनीच्या कृपेने व्यवसायात खूप प्रगती होईल. अचानक आर्थिक लाभ होण्याच्या अनेक शक्यता असतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल. शनिदेवाच्या आशीर्वादाने निर्णय क्षमता विकसित होईल. प्रवासाचे योग तयार होतील, जे फायदेशीर ठरतील. एकंदरीत ही शनी अमावस्या कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल.