मनाजोगती नोकरी हवी असल्यास या एस्ट्रो टिप्स अवलंबवा
प्रियेश खंडेलवाल
आपण नोकरीशी संबंधित समस्येमुळे त्रस्त आहात. प्रयत्न करून देखील मनासारखी नोकरी मिळत नाही तर काही एस्ट्रो टिप्स अवलंबवून बघा.
1 शुक्रवारी भाजके चणे ,गूळ आणि आंबट-गोड गोळ्या 8 वर्षापर्यंत च्या मुलांना वाटा.
2 नारळ घ्या त्या मध्ये छिद्र पाडून या छिद्रात तूप पिठी साखर भरून हे नारळ मंगळवारी एखाद्या वडाच्या झाडाखाली किंवा मुंग्या असलेल्या वारुळाच्या ठिकाणी ठेवा.
3 -5 वेळा असं करा. नक्कीच फायदा होईल.
3 मंगळवारी रात्री 12 वाजता चौरस्त्यावर जाऊन डाग नसलेल्या लिंबाच्या चार फोडी चारही दिशेला फेकून या. दोन गोष्टी लक्षात ठेवा की असं करताना पालटून बघायचे नाही आणि या वर विश्वास ठेवावा.
4 शुक्रवारी बंद कुलूप विकत आणा आणि रात्री उशाशी ठेवून झोपा. सकाळी अंघोळ करून एखाद्या देऊळात किंवा धार्मिक स्थळी जाऊन ते कुलूप चाबीसह तिथेच ठेवून या. जो कोणी ते बंद कुलूप उघडेल आपले नशीब देखील त्या बंद कुलुपा प्रमाणेच उघडेल आणि आपल्या प्रत्येक समस्येचे समाधान होईल.
5 कोणत्याही सिद्ध गणपतीच्या देऊळात जाऊन आपली समस्या किंवा इच्छा मनात बोलून उलटं स्वस्तिक बनवून या. नंतर आपले काम पूर्ण झाल्यावर सरळ स्वस्तिक बनवून या.
* टीप - या लेखात व्यक्त केलेली मते/ विश्लेषण लेखकाचे वैयक्तिक आहे. त्यात समाविष्ट असलेले तथ्य आणि विचार वेबदुनियाचे नाहीत आणि वेबदुनिया या साठी कोणतीही जबाबदारी घेत नाहीत.