शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (08:41 IST)

गर्भधारणेत प्रत्येक महिन्याच्या अधिपती ग्रहाचा मंत्र जपा, शिशु सामर्थ्यवान बनेल

एखाद्या स्त्रीसाठी आई होणे हे तिच्या जीवनातील सर्वोत्तम क्षण असतो. गर्भात वाढत असलेलं मुलं निरोगी राहावं आणि जन्मानंतर त्याचं संपूर्ण जीवन सुंदर, सुखद आणि आयुष्यमान असावा हीच इच्छा असते. शिशु गर्भात असताना त्याच्या संपूर्ण बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी गर्भसंस्काराची परंपरा देखील आहे. हे तर सर्वांना ज्ञात आहे मातेचा आहार, विचार, चिंतन-मनन आणि अध्ययनाचा शिशुव प्रभाव पडतो. 
 
त्याच प्रमाणे गर्भस्थ शिशुवर ग्रह नक्षत्राचा देखील पूर्ण प्रभाव असतो. म्हणून प्राचीन मुनींनी गहन अध्ययन आणि शोध करत गर्भकाळाच्या नऊ महिन्याच्या प्रत्येक महिन्यासाठी एक अधिपती ग्रह निश्चित केला आहे. गर्भाच्या त्या महिन्यासंबंधी ग्रहाचे चिंतन, मनन, जप, पूजन केल्याने शिशुची आयू, आरोग्य तसेच बुद्धी आणि बळ वाढतं. प्रत्येक महिन्यासंबंधी ग्रह मंत्र जपल्याने निश्चितच मुलं सर्व नऊ ग्रह साधून जन्माला येईल.
 
मंत्र
मासेश्वरा: सितकुजेज्यरवीन्दुसौरिचन्द्रात्मजास्तनुपचंद्रदिवाकरा: स्यु:।
 
गर्भाचे नऊ महिन्याचे ‍अधिपती ग्रह
 
प्रथम महिन्याचा स्वामी शुक्र,
दुसर्‍या महिन्याचा स्वामी मंगळ,
तिसर्‍या महिन्याचा स्वामी बृहस्पति,
चौथ्या महिन्याचा स्वामी सूर्य,
पाचव्या महिन्याचा स्वामी चंद्र,
सहाव्या महिन्याचा स्वामी शनि,
सातव्या महिन्याचा स्वामी बुध,
आठव्या महिन्याचा स्वामी लग्नपति,
अर्थात गर्भाधानावेळी असणारं लग्न स्वामी
नवव्या महिन्याचा स्वामी चंद्र,
दहाव्या महिन्याचा स्वामी सूर्य आहे.
 
या प्रकारे प्रत्येक महिन्याच्या अधिपती ग्रहाच्या मंत्राचा जप केल्याने गर्भस्थ शिशु निरोगी, सुखी, सुंदर, आणि सामर्थ्यवान होतो.