शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : गुरूवार, 21 जानेवारी 2021 (17:12 IST)

नवग्रहांना प्रसन्न करण्यासाठी शंख वापरा

धार्मिक शास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात शंखाचे अत्यंत महत्त्व सांगितले आहे पौराणिक कथेनुसार अमृताच्या प्राप्तीसाठी समुद्र मंथनाच्या वेळी त्यापासून प्राप्त झालेल्या 14 रत्नांपैकी शंखाची प्राप्ती झाली. शंख हा आई लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रिय आहे. हे घरात ठेवल्यानं सौख्य आणि समृद्धी येते. शंख हे कुबेराचे प्रतीक मानले आहे. आपणास माहीत आहे की शंखाचा वेग वेगळ्या पद्धतीने वापर करून आपण ग्रहांना देखील प्रसन्न करू शकता. ग्रहाच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी आपण दिवसानुसार शंखाचा वापर करू शकता. ज्याद्वारे आपण  ग्रहांना अनुकूल बनवू शकता.चला तर मग जाणून घेऊ या  ग्रहांना शुभ करण्यासाठी  शंखाचा वापर कसा करावं.  
 
* सोमवारचा दिवस भगवान  शिव आणि चंद्र ग्रहाचा मानला आहे. दुधाला चंद्राचे द्रव्य मानले आहे. चंद्राला अनुकूल बनविण्यासाठी सोमवारच्या दिवशी शंखा मध्ये दूध भरून भगवान शंकराला अर्पण करावे. या मुळे चंद्र बळकट होतो.
 
* मंगळवारचा दिवस मंगळाचा मानला आहे. मंगळ हा सामर्थ्य आणि धैर्याचा घटक आहे. मंगळ अनुकूल बनविण्यासाठी, मंगळवारी शंख वाजवून सुंदरकांड करावे. असं केल्यानं मंगळाच्या अशुभ स्थितीमुळे पडणाऱ्या दुष्प्रभावापासून सुटका होते.
 
* बुध हा बुद्धी आणि वक्तृत्वाचा घटक मानला जातो. बुधवारचा दिवस बुधग्रहासाठी मानला आहे, या दिवशी शंखा मध्ये पाणी आणि तुळस घालून शाळिग्रामाचा अभिषेक करावा. या मुळे आपला बुध ग्रह चांगला होतो.  
 
* गुरुवारच्या दिवशी शंखावर केसराने टिळा लावून भगवान विष्णूंची पूजा करावी. या मुळे आपलं गुरु ग्रह शुभ परिणाम देतात. भगवान विष्णू आणि गुरूच्या कृपेने घरात सौख्य आणि भरभराट होते.
 
* शुक्रवारच्या दिवशी हा दिवस शुक्र ग्रह चा मानला जातो. हा ग्रह धन वैभव आणि भौतिक सुख सोयींचा घटक मानला जातो. शुक्र बळकट करण्यासाठी शंख पांढऱ्या रंगाच्या कपड्यात ठेवावं. या मुळे शुक्र ग्रह बळकट होतो.
 
* शनिवार- पितृ दोषांचा परिणाम टाळण्यासाठी शंखामध्ये पाणी भरून शनिवारी दक्षिण दिशेला तोंड करून तर्पण करावं. असं केल्याने पितर प्रसन्न होऊन शुभाशीर्वाद देतात. घरात कलह होणं, कामात येणारे अडथळे,अपत्ये न होणं आणि पैशाची कमतरता होणं सारख्या समस्या कमी होऊ लागतात.

* ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्य मानाचा घटक मानला जातो. जर एखाद्याच्या पत्रिकेत सूर्य कमकुवत असेल तर त्याचा मान -सन्मानाला नुकसान  होऊ शकतो, वडिलांच्या नात्यात दुरावा येतो. सूर्याची स्थिती अनुकूल करण्यासाठी रविवारी शंखामध्ये पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावा.