1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 30 मार्च 2022 (13:15 IST)

एप्रिलमध्ये या 4 राशीच्या लोकांचे पलटणार नशीब, लक्ष्मी देवीची कृपा राहील

एप्रिल मध्ये अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन होत आहे. मेष ते मीन राशी पर्यंत सर्वांसाठी एप्रिल महिना महत्त्वाचा सिद्ध होणार आहे. एप्रिलमध्ये ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा काही राशींवर शुभ प्रभाव पडणार आहे आणि काही राशींना कष्टांना सामोरा जावं लागणार आहे. जाणून घ्या एप्रिल कोणत्या राशींच्या जातकांचे भाग्य उजळणार आहेत ते-
 
वृषभ- ज्योतिष शास्त्रानुसार, वृषभ राशीच्या जातकांसाठी एप्रिल महिना शुभ सिद्ध होणार आहे. एप्रिलमध्ये राहु राशीचं परिवर्तन होणार आहे. सध्या राहू स्वत:च्या राशीमध्ये विराजित आहे. राहुच्या आपल्या राशीतून निघताच जीवनात येणार्‍या समस्यांपासून मुक्ती मिळेल. यावेळी आपल्याला आपल्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. नोकरी करत असणार्‍या जातकांना प्रमोशनची शक्यता आहे. भाग्याची पूणपणे साथ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी देखील वेळ अनुकूल आहे.
 
सिंह- सिंह राशीच्या जातकांना एप्रिल महिन्यात अनेक कार्यांमध्ये यश मिळेल. या दरम्यान आपल्या कामाचे कौतुक होऊ शकतो. नोकरीत प्रगती होईल. व्यवसायात धन लाभ होण्याची शक्तया आहे. अभ्यासात अनुकूल परिणाम मिळतील. शांतीचं वातावरण राहील. आपल्या लक्ष्मी देवीची विशेष कृपा राहील.
 
वृश्चिक- एप्रिलचा महिना वृश्चिक राशीच्या जातकांसाठी फायदेशीर ठरेल. या दरम्यान इच्छित परिणाम प्राप्त होतील. एप्रिलमध्ये केतु आपल्या राशीतून निघून जातील. ज्यानंतर आपण समस्यांपासून मुक्त व्हाल. कुटुंबातील लोकांमध्ये प्रेम वाढेल. प्रेम संबंधात यश मिळेल. धनलाभाचे योग बनतील. गुंतवणुकीसाठी वेळ उत्तम आहे.
 
धनू- धनू राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती सुधारेल. शनिदेवाकडून मिळत असलेले कष्ट कमी होतील. देवी लक्ष्मीची कृपा राहील. या दरम्यान धन लाभाचे योग बनतील. नोकरीत परिवर्तनासाठी वेळ अनुकूल आहे.