रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

संकष्टी गणेश चतुर्थी : जाणून घ्या राशीनुसार कशी करावी पूजा

गणपती बाप्पा शुभ संकल्प पूर्तीचे देव मानले गेले आहे. कोणत्याही संकष्टी गणेश चतुर्थीला किंवा बुधवारी गणपतीची पूजा व आराधना केल्याने सर्व प्रकाराचे अडथळे दूर होतात. जसे आजार, आर्थिक समस्या, भय, नोकरी, व्यवसाय, घर, वाहन, विवाह, संतान, प्रमोशन इतर संबंधित अडचणी दूर होतात.
 
तर जाणून घ्या संकष्टी गणेश चतुर्थीला आपल्या राशीनुसार कशा प्रकारे गणपतीची आराधना करावी. 12 राशीच्या जातकांसाठी पूजन व विशेष उपाय:
 
मेष : मेष राशीच्या जातकांनी 'वक्रतुण्ड' रूपात गणपतीची पूजा करावी आणि 'गं' किंवा 'ॐ वक्रतुण्डाय हूं' मंत्राची एक माळ दररोज जपावी. गुळाचा नैवेद्य दाखवावा. 
विशेष उपाय : मेष राशीचे इष्ट देव गणपती आणि हनुमान आहे. म्हणून मंगळवारी हनुमानाला प्रसाद अर्पित करावा आणि पूर्ण प्रसाद मंदिरात वाटून द्यावा.
 
वृषभ : वृषभ रास असणार्‍यांनी गणपतीची 'शक्ती विनायक' रूपात आराधना करावी. आणि 'गं' किंवा 'ॐ हीं ग्रीं हीं' मंत्राची एक माळ दररोज जपावी. तूप-साखरेचा नैवेद्य दाखवावा.
विशेष उपाय : हनुमान किंवा गणपती मंदिरात मंगळवारी शुद्ध तुपाचा दोनमुखी दिवा लावावा. आर्थिक समस्या असल्यास कपाळाला केशर तिलक लावावे.
 
मिथुन : मिथुन राशीच्या जातकांनी गणपतीची 'लक्ष्मी गणेश' रूपात आराधना करावी. मुगाचे लाडू नैवेद्यात दाखवून 'श्रीगणेशाय नम: किंवा 'ॐ गं गणपतये नमः' मंत्राची एक माळ जपावी.
विशेष उपाय : गणपतीला बुधवारी मंदिरात लाडवांचा नैवेद्य दाखवावा. गरिबांना काळे कांबळे दान करावे. 
 
कर्क : कर्क रास असणार्‍यांनी 'वक्रतुण्ड' रूपात गणपतीची पूजा करावी आणि 'ॐ वरदाय न:' किंवा 'ॐ वक्रतुण्डाय हूं' मंत्राने एक माळ जपावी. गणपतीला पांढरे चंदन आणि पांढर्‍या रंगाचे फुलं अर्पित करावे.
विशेष उपाय : दररोज चंदन तिलक करावे आणि वयस्करांना सन्मान द्यावा.
 
सिंह : सिंह राशीच्या जातकांनी 'लक्ष्मी गणेश' रूपात गणपतीची पूजा - अर्चना करावी आणि लाल फुल अर्पित करत मोतीचूरच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा. 'ॐ सुमंगलाये नम:' मंत्राची एक माळ जपावी. 
विशेष उपाय : लाल रंगाचा रुमाल आपल्याजवळ ठेवावा आणि गणपती मंदिरात मनुका अर्पित कराव्या.
 
कन्या : कन्या राशीच्या जातकांनी लक्ष्मी गणेश' रूपात गणपतची ध्यान करावे. पूजन करताना 21 जोडी दूर्वांची अर्पित करत 'ॐ चिंतामण्ये नम:' मंत्राची एक माळ दररोज जपावी. 
विशेष उपाय : गणपतीची दररोज पूजा करावी. स्थायी यश प्राप्तीसाठी तुळशीची माळ धारण करावी आणि कधीही घरात कुत्रं पाळू नये.
 
तूळ : तूळ रास असणार्‍यांनी 'वक्रतुण्ड' रूपात गणपतीची आराधना करावी आणि पूजा करताना 5 नारळ अर्पित करावे. नंतर 'ॐ वक्रतुण्डाय नम:' मंत्राचा जप करावा. 
विशेष उपाय : लहान भावंडाची मदत करावी आणि गणपती मंदिरात कोणत्याही वारी सकाळी 11 वाजेपूर्वी आधी तुपाचा दिवा लावावा.
 
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या जातकांनी 'श्वेतार्क गणेश' रूपात आराधना करावी आणि पूजेत शेंदूर आणि लाल फुलं अर्पित करावी। 'ॐ नमो भगवते गजाननाय' मंत्राची एक माळ दररोज जपावी.
विशेष उपाय : केळीच्या झाडाला पाणी चढवून पूजा करावी. कधीही नशा करू नये.
 
धनू : धनू रास असणार्‍यांनी दर रोज 'ॐ गं गणपते मंत्र' जपावा. गणपतीला पिवळ्या रंगाचे फुलं आणि नैवेद्यात बेसनाचे लाडू चढवावे. या राशीच्या जातकांनी 'लक्ष्मी गणेश' रूपाची आराधना करावी.
विशेष उपाय : शांती आणि समृद्धीसाठी घरात कचरा किंवा घाण होऊ नये याची काळजी घ्यावी. पिवळ्या वस्त्राच्या आसनावर गणपतीला ईशान कोपर्‍यात विराजमान करून त्यांच्या समक्ष गुरुवारी तुपाचा दिवा लावावा.
 
मकर : मकर रास असणार्‍यांनी 'शक्ती विनायक' गणपतीची आराधना करावी. पूजा दरम्यान गणपतीला विड्याचं पान, सुपारी, वेलची व लवंग अर्पित करावे. 'ॐ गं नम:' मंत्राची एक माळ दररोज जपावी.
विशेष उपाय : गुरुवारी गणपती, लक्ष्मी किंवा विष्णू मंदिरात पिवळे फुलं अर्पित करावे. लाल बैलाला गोड पोळी खाऊ घालावी.
 
कुंभ : कुंभ राशीच्या जातकांनी 'शक्ती विनायक' गणपतीची पूजा करावी आणि 'ॐ गण मुक्तये फट्‍' मंत्राची एक माळ दररोज जपावी.
विशेष उपाय : आपल्या घरातून कोणीही उपाशी जाऊ नये याची काळजी घ्यावी. भोजन करताना वरून मीठ घेणे टाळावे तसेच मंगळवार, गुरुवार किंवा रविवार व्रत करणे योग्य ठरेल.
 
मीन : मीन रास असणार्‍यांनी 'हरिद्रा गणेश' ची पूजा केली पाहिजे. 'ॐ गं गणपतये नमः' किंवा 'ॐ अंतरिक्षाय स्वाहा' मंत्राची एक माळ दररोज जपावी. पूजा दरम्यान मध आणि केशराचे नैवेद्य दाखवावे.
विशेष उपाय : गणपती मंदिरात प्याऊ लावण्यासाठी दान करावे. पिंपळाच्या झाडाच्या मुळात पाणी घालावे आणि कधीही खोटे बोलू नये.