सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

दृष्ट कशी काढावी? जाणून घ्या 7 सोपे उपाय

सुंदर, गुटगुटीत लहान मुलांना लगेच दृष्ट लागते. ज्यामुळे ते वारंवार आजारी पडतात, त्याच्या आहारावर परिणाम होतं आणि ते सुस्त आणि कमजोर दिसू लागतं.

जाणून घ्या नजर काढण्यासाठी 7 सोपे उपाय
 
लहान मुलांना जेवू घातल्यावर उरलेलं अन्न कुत्र्याला खाऊ घालावं.
अनेकदा लहान मुलं अर्ध्या रात्री उठून बसतात. अशात पलंगाखाली झाडू ठेवावी.
मुलांना दूध पाजताना दुधाच्या बाटलीला कव्हर करावे. 
मुलांना नजर लागली असल्यास आपल्या उजव्या हातात 2 लाल मिरच्या आणि जरा मीठ घ्यावं. मुलांना पूर्वीकडे तोंड करून त्यांना चारी बाजूने तीनदा वर, तीनदा खाली, तीनदा उजवीकडे आणि तीनदा डावीकडे ओवाळावे. नंतर हे पदार्थ तव्यावर जाळून द्यावे.
लहान मुलांना चार चौघात जेवू घालणे टाळावे.
मुलं 1 वर्षाचं झाल्यावर त्याच्या कमरेत कमी वजनी आणि न टोचणारी लोखंडी वस्तू काळा दोर्‍यात ओवून बांधावा.
लहान मुलांच्या डोक्याला, कानामागे किंवा तळहात व तळपायाला काळा तीट लावल्याने वाईट नजरेपासून वाचता येईल.