शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (00:50 IST)

21 तांदळाचे दाणे पर्समध्ये ठेवा आणि धन कमवा

सगळ्या महिलांना वाटत असते की त्यांची पर्स ही भरपूर पैशांनी भरलेली असावी. मेहनत करून देखील बर्‍याचवेळेस पाहिजे तेवढे धन आपल्याला प्राप्त होत नाही. ज्योतिष्यानुसार कुंडलीमध्ये जर ग्रहाची बाधा असेल तर व्यक्तीस गरिबी सारख्या समस्येला सामोरे जावे लागते.
 
ज्योतिष शास्त्रात आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी असंख्य उपाय सांगण्यात आले आहेत. तुम्हीदेखील कुठल्या ग्रहाच्या बाधेमुळे चिंतीत आहात आणि पर्समध्ये अधिक काळासाठी धन टिकत नसेल तर खाली दिलेला उपाय करावा.
 
कुठल्याही शुभ दिवशी म्हणजे अक्षय तृतीया, पोर्णिमा अथवा दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून लाल रंगाचे रेशमी कापड घेवून त्यात 21 तांदळाचे दाणॆ ठेवा. नंतर त्यास लाल रंगाच्या कपड्यात एकत्रित बांधून लक्ष्मी देवतेची विधिवत पुजा करावी. पुजेत लाल रंगाच्या कपड्यातील तांदूळ ठेवावे. पुजेनंतर लाल कापड्यात बांधलेले तांदूळ पर्समध्ये लपवून ठेवावे. अशा प्रकारे पर्समध्ये तांदळाचे 21 दाणे ठेवल्याने तुमची पैशा संबधीत सर्व अडचणींपासून सुटका होण्यास मदत होईल.