मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

सॅमसंग गॅलॅक्सी नोट 9 मध्ये आग लागली, महिलेचं बोट जळालं

सॅमसंग नोट सीरीज पुन्हा एकदा आग लागल्यामुळे चर्चेत आहे. बातमीप्रमाणे न्यूयॉर्कमध्ये एक महिलेच्या पर्समध्ये ठेवलेल्या सॅमसंगच्या नवीन फ्लॅगशिप गॅलॅक्सी नोट 9 मध्ये आग लागली. 
 
डियान चुंग नावाची महिला रिअल स्टेट एजेंट आहे. 3 सप्टेंबरला मध्य रात्री लिफ्टमध्ये फोन वापरताना फोन गरम वाटत होता नंतर तिने फोन पर्समध्ये ठेवला. लगेच फोनमधून आवाज येऊ लागली आणि पर्समधून धूर निघू लागला. नंतर तिने फोन 
 
पर्समधून बाहेर काढला तर तिचं बोट जळालं. पर्समधून फोन काढून फेकला तरी तो खूप वेळेपर्यंत जळत राहिला. नंतर एका व्यक्तीने फोन कपड्यात गुंडाळून पाण्याने भरलेल्या बादलीत टाकला.
 
याबाबत महिलेने सुप्रीम कोर्टात तक्रार नोंदवून नुकसान भरपाईची मागणी केली असून हा मॉडेल बंद करण्याची मागणी केली आहे.
 
तसेच या प्रकरणात सॅमसंग कंपनीप्रमाणे गॅलॅक्सी नोट 9 बद्दल अशी पहिलीच घटना समोर आली आहे. उल्लेखनीय आहे की सॅमसंग नोट सीरीजच्या नोट 7 मध्ये आग लागण्याचे प्रकरण घडल्यानंतर कंपनीला हे मॉडल परत मागवावे लागले होते.