सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 15 नोव्हेंबर 2018 (00:28 IST)

समुद्र शास्त्र – दात देखील सांगतात तुमच्या स्वभावाबद्दल

समुद्र शास्त्र किंवा सामुद्रिक शास्त्र, ज्योतिष शास्त्राचाच एक भाग आहे. ही एक अशी विद्या आहे ज्याच्या माध्यमाने कुठल्याही मनुष्याच्या शरीरातील विभिन्न अंगांना बघून त्याच्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकतो तसेच त्याच्या येणार्‍या भविष्याचे देखील अनुमान लावू शकतो.
 
हे अगदी तसेच आहे जसे हाताच्या रेषा बघून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव व भविष्याबद्दल सांगणे. समुद्र शास्त्रानुसार, दात बघून देखील एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि चरित्राबद्दल अनुमान लावण्यात येतो. जाणून घेऊ वेग वेगळ्या प्रकारचे दात असणार्‍या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो -
 
1. ज्या स्त्रियांचे दात थोडे पुढे आलेले असतात त्या फार बोलतात आणि आपली गोष्टी कबूल करवून घेण्यात एक्सपर्ट असतात. यामुळे कुटुंबात त्यांचे फारसे कोणाशी पटत नाही. ह्या कधीतर हंसमुख तर कधी रागीट होऊन जातात.

2. ज्यांचे दात सरळ आणि सपाट रेषांमध्ये असतात, ते धनवान असतात. असे लोक कोणाची नोकरी करत नाही. आपले ओळखीचे व नातेवाइकांप्रती यांचा स्वभाव फारच चांगला असतो. यांना दिखावा करायला आवडत.
 
3. पांढरे व सुंदर दात असणारे व्यक्ती भाग्यशाली असतात. हे सर्वांशी लवकर मिसळून जातात. हे फारच इमोशनल असून लगेचच कोणावरही भरवसा करून घेतात. यामुळे यांना बर्‍याचवेळा धोका पत्करावा लागतो.
 
4. ज्या व्यक्तीच्या दातांमध्ये गॅप असतो, ते लोक दुसर्‍यांच्या पैशांवर ऐष करणारे असतात. अशा लोकांना पैतृक संपती देखील मिळते आणि जन्मभर हे यावर निर्भर राहतात. हे फार खर्चिक असतात.
 
5. ज्या लोकांचे दात हलके काळ्या रंगाचे असतात, ते फारच चतुराईने आपले काम काढतात, हे स्वभावाने भांडखोर असतात. वरून दिसण्यात हे जेंटलमेन दिसतात, पण आतून फारच स्वार्थी असतात.
 
6. ज्या लोकांचे दात पिवळ्या किंवा हलके लाल रंगांचे असतात ते हसमुख असतात. या लोकांवर भरवसा करता येतो. या लोकांना लोकांशी भेटणे आणि हसी मजाक करणे पसंत असते.
 
7. काळे व आकडे वाकडे दात असणारे व्यक्ती आधी आपल्याबद्दल विचार करतात. आपले हेतू काढण्यासाठी हे कोणाशी पण मैत्री करून घेतात आणि काम झाल्यानंतर त्यांना सोडून देतात. हे स्वभावाने लालची असतात.