शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

तुमची प्रेमकथा या कारणांमुळे अपूर्ण राहाते

असे म्हणतात प्रेमापासून तुम्ही कितीही दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी आयुष्यात कधी न कधी तुम्ही या प्रेमाच्या जाळ्यात अडकतात.

परंतु वास्तविक जीवनात अनेक प्रेमवीर फक्त प्रेमवीरच रहातात, म्हणजे ते प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत लग्नाच्या बंधनात बांधले जात नाहीत.

त्यामागे अनेक कारणे असू शकतात कुटुंब, समाज आणि त्यांच्या जीवनात तयार होण-या परिस्थितीनुसार त्यांना त्यांच्या प्रेमापासून दूर जावे लागते.

पण एक गोष्ट आशी आहे ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही प्रेम अपूर्ण राहण्यामागे ग्रह, नक्षत्रही कारणीभूत असू शकतात.ज्योतिष शास्त्राच्या अधारानुसार प्रेम करणाऱ्या जोडप्यांना वेगळे होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या कुंडलीत असलेल्या ग्रहांची रचना.

- ज्योतिष शास्त्रानुसार तीन ग्रहांमुळे प्रेमयोग तयार होतो. सूर्य, बुध, शुक्र या तीन ग्रहामुळे मनुष्य प्रेमात पडतो, आणि कुंडलीत या तीन ग्रहांची युती झाली तर प्रेम विवाह निश्चित होतो.

- जर हे तिन्ही ग्रह क्रमाने वेगवेगळ्या घरात असतील तर प्रेम जुळते पण ते पूर्णत्वास जात नाही.

- सूर्य, बुध आणि शुक्र या गृहातील कोणतेही दोन ग्रह एकसोबत आले तर अनेक कष्टानंतर प्रेमविवाह होतो.

- सूर्य आणि बुध कुंडलीच्या सातव्या घरात आले तर तुमचे तुमच्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत प्रेम संबंध तयार होऊ शकतात.

- कुंडलीत जर शुक्र ग्रह बलवान असेल तर तुम्ही अनेक व्यक्तीसोबत प्रेम करू शकता, परंतु बाकीचे दोन ग्रह कमकुवत असतील तर त्या व्यक्तीला खरे प्रेम भेटत नाही.

प्रेमविवाह करायचा असेल तर करा हे उपा

- तुमचा साथीदाराचे नाव पिंपळाच्या पानावर लिहा आणि रविवार, सोमवार, मंगळवारी ते पान शिवलिंगावर अर्पण करा.

- शिवचालीसाचे पाठ करा.

- महाकालीचे पूजन मंगळवारी करा.