सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

राशीतील सूर्य दोष

सूर्य खरंतर आरोग्य, यश, किर्ती आणि बुद्धी देवता आहे. आणि तो वाईट असण्याचा सरळ अर्थ हाच की, यश, धन, आरोग्याबरोबरच मानसिक बळ, आध्यात्मिक प्रवृत्ती यांचे खच्चीकरण. राशीत जर सूर्य अशुभ असेल तर प्रेम, दया भावना नष्ट करतो. जर सूर्य चंद्र, मंगळ आणि बुध सोबत असेल तर तो शुभ फलदायी आहे. याउलट शनी, शुक्र , राहू आणि केतूसोबतचे त्याचे वास्तव्य शुभ दृष्टी नष्ट करते. 

मानसिक कष्ट, हार्टअटॅक, पित्याचा लहानपणीच मृत्यू आणि लहानपणापासूनच दु:ख आणि आजाराने ग्रासले असेल वा शरीराच्या एका भागात पक्षाघात (पॅरालिसिस) अशा स्थितींचा सामना करावा लागत असल्यास हे निश्चित मानावे की राशीत सूर्य वाईट स्थानी आहे. याशिवाय डोळ्यांचा त्रास, हाडांचे कमजोर होणे, सरकारी कार्यात बाधा, संतान प्राप्तीत बाधा, चेहरा निस्तेज होणं, मनात सतत शंकाकुशंका असणं, पित्याशी वाईट संबंध वा खोटेपणाच्या आरोपाला सामोरे जावं लागणं, या सर्व स्थिती राशीतील सूर्याचे वाईट स्थान निर्माण करत असतो.

या सर्व कष्टांवर समाधान :
गुळ आणि गहूचे दान करा. चुकूनही कोणाकडून बाजरी, तांदूळ वा गहू मोफत घेऊ नका.
८ दिवस कोणत्याही देवळात तेल, बदाम व नारळ दान करा.
कोणा ज्येष्ठ पुरोहितास लाल रंगातील तांब्याची वस्तू भेट द्यावी.
काहीही गोड खाल्ल्यानंतर पाणी प्या. मीठ कमीत कमी खा. सतत ११ दिवसांपर्यंत अंध व्यक्तींस स्वादिष्ट भोजन द्या.
गंगाजळ वा कुठल्या पवित्र नदीच्या पाण्यात चांदीचा तुकडा बुडवून ठेवा.