शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

मंगल-राहू अंगारक योग, या राशींवर पडेल प्रभाव

कुंडलीत मंगल जेव्हा राहू किंवा केतू सोबत असतात तेव्हा अंगारक योग बनतं. 7 मे 2019 मध्ये मंगल आणि राहू मिथुन राशी मध्ये अंगारक योग बनत आहे. कुंडलीच्या 12 भावांमध्ये या योगाच्या प्रभाव देखील वेगवेगळे असू शकतात. कुंडलीच्या कोणत्याही भावामध्ये युती झाल्यावर ॐ अं अंगारकाय नमः चा नियमित जप आणि हनुमान चालीसाचा पाठ फायदेशीर ठरतो.
 
मेष, सिंह, धनू आणि मीन रास : या 4 राशींसाठी शुभ आहे हा योग
 
या राशींमध्ये, मंगळ चांगल्या स्थितीत असेल आणि राहू मंगळाला अधिक मजबूत करेल. असे व्यक्ती साहसी आणि सक्रिय होतील. त्यांच्या इच्छा शक्ती उच्च पातळीवर असेल आणि त्यांचे कार्य योग्य रित्या निर्देशित होतील.
 
मकर रास : या राशीसाठी अत्यंत शुभ आहे अंगारक योग
 
मकर राशीत मंगल आणि राहूची युतीचा प्रभाव सर्वात चांगला ठरतो, जेथे मंगल उच्च आहे तेथे राहू उच्च राशीचे मंगल परिणाम देतो. याच्या प्रभावामुळे व्यक्ती परिश्रमी राहतो आणि नेहमी कायद्यात राहून काम करत असतो.
 
कर्क रास : या राशीसाठी अती अशुभ
मंगल दुर्बल असल्यामुळे कर्क राशीत याचा प्रभाव वाईट पडू शकतो आणि राहू दुर्बल मंगलच्या परिणामामुळे वाईटपणे प्रभावित करेल. याच्या प्रभावामुळे व्यक्ती रागीट व्यवहार करू शकतो आणि शारीरिक मारहाण, भांडण देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
वृश्चिक रास : अनपेक्षित उतार-चढ
येथे मंगल स्व राशीत आहे, परंतू राहूची उपस्थितीचा अर्थ व्यक्तीच्या जीवनात काही अनपेक्षित चढ-उतर राहतील. परंतू मंगलच्या उपस्थितीमुळे चढ-उताराला सामोरा जाण्याची इच्छा शक्ती मिळेल. रहस्य विज्ञानात असे व्यक्ती चांगले परिणाम देऊ शकतात.
 
मिथुन, कन्या, आणि कुंभ रास : समस्यांचा सामना करावा लागेल
 
येथे मंगळ शत्रू राशीत आहे, म्हणून अशा व्यक्तींकडे कार्यासंबंधी योग्य विचार, दिशा, वेळ नाही.
 
वृषभ आणि तूळ रास : सामान्य, न वाईट न चांगलं
 
येथे मंगल तटस्थ भावात आहे. खूप चांगले नाही आणि खूप वाईट देखील नाही म्हणजे योग सामान्य प्रभाव देणारे आहे. या राशींमध्ये राहू-मंगल युती व्यक्तीला कुंडलीचे भाव आणि राशी संबंधित कारक प्रती मेहनती करेल.