हे फूल बनवू शकतो तुम्हाला धनवान, करा यातून 1 उपाय
तंत्र क्रियांमध्ये बर्याच प्रकारच्या वनस्पतींचा वापर करण्यात येतो, त्यात नागकेसरचे फूल देखील एक आहे. तंत्र क्रियांमध्ये नागकेसरला फारच शुभ वनस्पती मानण्यात आले आहे. नागकेसर एक धनदायक फूल आहे. याच्याशी निगडित काही सोपे उपाय ज्याने धन लाभ, व्यापारात नफा इत्यादी होण्यास मदत मिळते. हे उपाय या प्रकारे आहे -
1. चांदीची एक लहानशी झाकण असणारी डिब्बी घ्या, त्यात नागकेसर व मध भरून शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी रात्री किंवा इतर कोणत्याही शुभ मुहूर्तात आपल्या तिजोरीत ठेवा. तुमच्या घरात धनवृद्धी होणे सुरू होईल.
2. प्रत्येक शुक्रवारी 1 नागकेसरचे फूल घ्या आणि याची पूजा करा. त्यानंतर याला पांढर्या कपड्यात लपेटून आपल्या दुकानाच्या गल्ल्यात किंवा आपल्या ऑफिसच्या केश बॉक्समध्ये ठेवले तर कधीही पैशांची तंगी राहणार नाही.
3. एखाद्या पौर्णिमेपासून सुरू करून पुढच्या पौर्णिमेपर्यंत नेमाने शिवलिंगावर नागकेसरचे फूल वाहायला पाहिजे. शेवटच्या दिवशी वाहिलेल्या फुलाला घरी घेऊन जा. हे फुल धन संबंधी तुमच्या सर्व समस्या दूर करतील.
4. व्यापारात नुकसान होत असेल तर एखाद्या शुभ मुहूर्तात निर्गुण्डी (एक प्रकारची वनस्पती)ची जड, नागकेसरचे फूल आणि पिवळ्या सरसोचे दाणे एक लहान पोटलीत बांधून दुकानाच्या बाहेर टांगून द्या. असे केल्याने व्यापारात वाढ होते.
5. नागकेसरचे फूल, साबूत हळद, सुपारी, एक शिक्का, तांबत्याचा तुकडा आणि तांदुळाला कपड्यात बांधून लक्ष्मीजवळ ठेवा आणि त्याची पूजा करा. नंतर या पोटलीला आपल्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने घरात बरकत राहील.