मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

जन्मवारावरुन ओळखा तुमचा स्वभाव

रविवार
या दिवशी जन्मलेली व्यक्ति हुशार, शक्तीशाली,  दानशूर आणि मनस्वी असते. निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात या व्यक्तीला यश हमखास मिळते.
 
सोमवार
या दिवशी जन्मलेली व्यक्ति अत्यंत शांत स्वभावाची असते.सर्वांशी गोड बोलणे आणि त्याप्रमाणे वागणे तसेच  या व्यक्तीला व्यवहारज्ञान असते. मोठयांच्या आज्ञेत राहणारी आणि मनाने उदार असते.

मंगळवार
या दिवशी जन्मलेली व्यक्ती बºयाचदा केवळ वाचाळ बडबड करणारी अनेकदा खोटे बोल पण रेटून बोल अशा स्वभावाची असते.  भांडण करण्यात आघाडीवर आणि तापट असते.
 
बुधवार
या दिवशी जन्मलेली व्यक्ती हुशार असते पण, गोड बोलून मागे टीका करणे हा स्थायीभाव असतो. चेष्टामस्करी करणे त्याचबरोबर इतरांचे गुण- अवगुण पारखणारी आणि व्यवसायिक वृत्तीची असते.

गुरुवार
या दिवशी जन्मलेली स्वत:च्या इच्छेनुसार वागणारी असते.  मनमिळाऊ स्वभाव, शिक्षणात रस आणि आपल्या गुणवत्तेने धन, सन्मान मिळवणारी असते.
 
शुक्रवार
या दिवशी जन्मलेली व्यक्तीला छानचांगले कपडे वापरण्याची हौस असते. मनाने चांगली, सदाचारी, मोठ्यांचा आदर राखणारी असते. मोठ्या पदावर नोकरी करण्याचा योग या व्यक्तींना असतो.
 
शनिवार
या दिवशी जन्मलेल्या व्यक्तीला मंत्र -तंत्र विद्येत रस असतो. स्वकर्तृत्ववान लळा लावणारी अशी अतिशय बुद्धिवान असते.