शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (23:00 IST)

नोव्हेंबरचा महिना या राशींसाठी वरदान घेऊन येईल

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने नोव्हेंबर महिना काही राशींसाठी खूप खास आणि शुभ असणार आहे. नोव्हेंबर महिन्यात बुध, सूर्य आणि गुरूच्या राशींमध्ये बदल होईल. राशी बदलाचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. मंगळवार, 2 नोव्हेंबर रोजी बुध कन्या राशीतून निघून तूळ राशीत प्रवेश करेल. यानंतर, 21 नोव्हेंबर रोजी, रविवारी  तूळ राशीतून वृश्चिक राशीत जाईल. 16 नोव्हेंबरला सूर्याचे राशी परिवर्तन होणार आहे. या दिवशी सूर्य तुळ राशी सोडून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. 20 नोव्हेंबर रोजी गुरुचे राशी परिवर्तन होणार आहे. बृहस्पति कुंभ राशीत प्रवेश करेल. सूर्य, बुध आणि गुरूच्या बदलामुळे नोव्हेंबर महिना काही राशींसाठी खूप शुभ राहील. जाणून घेऊया, कोणत्या राशींसाठी नोव्हेंबर महिना शुभ राहणार आहे.
 
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी म्हणता येणार नाही.
वैवाहिक जीवन आनंदी राहील.
कामात यश मिळेल.
आर्थिक बाजू मजबूत राहील.
मित्रांचे सहकार्य मिळेल.
धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
 
कर्क राशि
कर्क राशीत शुक्राचा बदल एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही.
व्यवसायात लाभ होईल.
कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल.
जोडीदारासोबत वेळ घालवाल.
नोकरदारांसाठीही हा काळ शुभ राहील.
 
कन्या राशि
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहणार आहे.
आत्मविश्वास वाढेल.
नोकरी-व्यवसायात लाभ होईल.
तुमच्या कामाचे कौतुक होईल.
धनलाभ होईल, आर्थिक समस्या दूर होतील.
जोडीदारासोबत वेळ घालवाल.
 
मकर राशि
मकर राशीच्या लोकांसाठी शुक्राचे परिवर्तन शुभ राहणार आहे.
नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ वरदानापेक्षा कमी म्हणता येणार नाही.
आर्थिक बाजू मजबूत राहील.
वैवाहिक जीवन आनंदी राहील.
कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल.
यावेळी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.
धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
 
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या.)