बुधवार, 1 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified सोमवार, 11 एप्रिल 2022 (11:46 IST)

आपल्‍या मुलीचे जीवन वाचवण्‍यासाठी वडिलांचे वीर दान: आपले 150 सेमी आतडे केले दान

liver
ग्‍लोबल हॉस्पिटलमधील लिव्‍हर, पॅन्‍क्रीयाज अॅण्‍ड इंटेस्‍टाइन ट्रान्‍सप्‍लाण्‍ट्स व एचपीबी सर्जरीचे संचालक भारतीय डॉ. गौरव चौबल यांनी 7वर्षीय रूग्‍णावर लिव्हिंग डोनर इंटेस्टिनल प्रत्‍यारोपण केले, जिला जन्‍मापासून टर्मिनल स्‍यूडो ऑब्‍स्‍ट्रक्‍शन (स्‍नायू आंकुचन पावण्‍यास असक्षम), तसेच विविध यकृत आजार देखील होते. क्रोनिक इंटेस्टाइनल स्‍यूडो-ऑब्‍स्‍ट्रक्‍शन हा या 7 वर्षीय मुलीला असलेला दुर्मिळ आजार आहे, ज्‍यामध्‍ये हालचाल (स्‍नायूंची आंकुचन पावण्‍याची क्षमता) कमी होते आणि पचनसंस्‍थेमधील स्नायू, मज्‍जातंतू व संप्रेरक यांच्‍यामधील आकुंचन क्रियेमध्‍ये समन्‍वय राहत नाही. परिणामत: पचनसंस्‍थेवर परिणाम होतो आणि आतड्यांच्‍या कार्यामध्‍ये अडथळा निर्माण होतो.
 
सिंगापूरच्‍या इतिहासामध्‍ये ही लिव्हिंग डोनरसह आतड्यासंबंधित प्रत्‍यारोपणाची यशस्‍वी शस्त्रक्रिया करण्‍याची पहिलीच घटना आहे. 2012मधील निर्थयाचे सामूहिक बलात्‍कार व हत्‍या प्रकरण सिंगापूरसाठी संदर्भित केस ठरले. निर्भयाला उपचारासाठी सिंगापूरला नेण्‍यात आले होते. पण तेथे तिला आतड्यासंबंधित प्रत्‍यारोपणासाठी प्रतिक्षायादीमध्‍ये राहावे लागले. गंभीर दुखापती झाल्‍या असल्‍यामुळे तिचा मृत्‍यू झाला. जिवित व कॅडवेर दाता आणि वैद्यकीय कौशल्‍याच्‍या अभावामुळे प्रत्‍यारोपण होऊ शकले नव्‍हते. दशकानंतर 2022मध्‍ये सिंगापूरमधील आरोग्‍यसेवा क्षेत्रामध्‍ये मोठी उत्‍क्रांती दिसून आली आहे, जेथे भारताला बदल घडवून आणण्‍यासाठी महत्त्वाची भूमिका बजावयाची आहे. त्‍यावेळी प्रयोगात्‍मक टप्‍प्‍यावर असलेल्या आतड्यांसंबंधित प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रियेने आज 7वर्षीय मुलीचे जीवन वाचवले आहे.
 
सिंगापूरमधील 7वर्षीय मुलीमध्‍ये जन्‍मापासून खाण्‍यामध्‍ये असक्षम व सतत उलटी होणे अशी लक्षणे दिसून येत होती. तिच्‍यावर टोटल पॅरेण्‍टरल न्‍यूट्रिशन (टीपीएन) उपचार सुरू होता, ज्‍यामध्‍ये मध्‍य रक्‍तवाहिनीच्‍या माध्‍यमातून सूक्ष्‍म पौष्टिक घटक, फ्लूइड्स व इलेक्‍ट्रोलाइट्सचे व्‍यवस्‍थापन केले जात होते. तिचे आरोग्‍य खालावत गेले आणि फक्‍त एकच पर्याय उरला होता तो म्‍हणजे आतड्यासंबंधित प्रत्‍यारोपण. या शस्‍त्रक्रियेला मोठे यश मिळाले. दात्याकडून एकूण 150 सेमी लांबीची टर्मिनल इलियम काढण्‍यात आली. प्राप्‍तकर्तीमधून बिघाड झालेले आतडे काढण्‍यात आले आणि दात्याचे आतडे प्रत्‍यारोपित करण्‍यात आले. प्रत्‍यारोपण केलेल्‍या आतड्याने उत्तम पर्फ्यूजन व कार्य दाखवले. ऑपरेशन झाल्‍यानंतर पहिल्‍या दिवशी प्रत्‍यारोपित केलेल्‍या आतड्याचे आरोग्‍य उत्तम दिसले. 
 
मुंबईतील परेल येथील ग्‍लोबल हॉस्पिटलमधील लिव्‍हर, पॅन्‍क्रीयाज, इंटेस्‍टाइन ट्रान्‍सप्‍लाण्‍ट प्रोग्राम व एचपीबी सर्जरीचे संचालक डॉ. गौरव चौबल म्‍हणाले, ''जगभरात आतड्यासंबंधित प्रत्‍यारोपण जटिल व दुर्मिळ आहे. सिंगापूरमध्‍ये पहिल्‍यांदाच अशाप्रकारचे प्रत्‍यारोपण करण्‍यात आले आहे. आमच्‍या अनुभवानुसार जिवित दाता सुरक्षितपणे त्‍यांचे जवळपास 30 ते 40 टक्‍के आतडे दान करू शकतो. आतड्याचे स्‍यूडो ऑब्‍स्‍ट्रक्‍शनसह निदान झालेली प्राप्‍तकर्तीवर 7 वर्षांपासून टीपीएन उपचार सुरू होता. प्रत्‍यारोपण करण्‍यापूर्वी बारकाईने नियोजन करण्‍यात आले. यामध्‍ये ट्रान्‍सप्‍लाण्‍ट सर्जन्‍स, गॅस्ट्रोएण्‍टेरोलॉजिस्‍ट्स, अॅनास्‍थेटिस्‍ट्स, न्‍यूट्रिशनिस्‍ट्स आणि इंटेन्सिविस्‍ट्ससोबत परिचारिका व इतर पॅरा क्लिनिकल स्‍टाफचा समावेश होता. अवयवांच्‍या रोगप्रतिकारक जुळणीच्‍या खात्रीसाठी संभाव्‍य दाता व प्राप्‍तकर्ता मुलीच्‍या अनेक चाचण्‍या करण्‍यात आल्‍या. शस्‍त्रक्रियेनंतर वडिल व मुलगी दोघेही उत्तम आहेत आणि ती लवकरच बरी होणार आहे.'' 
 
सिंग हेल्‍थचा ट्रान्‍सप्‍लाण्‍ट विभाग, ड्यूक युनिव्‍हर्सिटीचा अॅब्‍डोमिनल ट्रान्‍सप्‍लाण्‍ट्स विभाग आणि डॉ. गौरव चौबल यांच्‍या आंतरराष्‍ट्रीय सहयोगामुळे हे प्रत्‍यारोपण शक्‍य झाले. सिंग हेल्‍थ इंटेस्टिनल ट्रान्‍सप्‍लाण्‍ट कमिटीच्‍या अध्‍यक्ष प्रो. प्रेमा राज, तसेच अॅब्‍डोमिनल सर्जरीच्‍या विभाग प्रमुख डॉ. डेब्रा सुदन यांनी या ऐतिहासिक प्रत्‍यारोपणाचा भाग होण्‍यास डॉ. गौरव यांना आमंत्रित केले. त्‍यांनी भारतातील आतड्यासंबंधित प्रत्‍यारोपणाच्‍या (जिवित व कॅडवेरिक) सर्वात मोठ्या सिरीजवर काम केले आहे.
 
यूएसएमधील ड्यूक युनिव्‍हर्सिटी हॉस्पिटलच्‍या अॅब्‍डोमिनल ट्रान्‍सप्‍लाण्‍ट सर्जरीच्‍या संचालक आणि या आतड्यासंबंधित प्रत्‍यारोपणासाठी प्रमुख सर्जन डॉ. सुदन म्‍हणाल्‍या, ''या लहान मुलीसाठी पॅरेण्‍टरल न्‍यूट्रिशनची जटिलता जीवनास धोकादायक होती आणि दीर्घकाळापर्यंत जगण्‍यासोबत जीवनाचा दर्जा सुधारण्‍यासाठी तिच्‍याकडे एकच आशा होती, ती म्‍हणजे आतड्यासंबंधित प्रत्‍यारोपण. सुदैवाने तिच्‍या वडिलांना त्‍यांच्‍या आतड्यांचा काही भाग दान करता आला आणि शस्‍त्रक्रियेला यश मिळाले. दोघेही उत्तमरित्‍या बरे होत आहेत आणि आम्‍हाला मोठी आशा आहे की, ती या जिवित दात्याच्‍या आतड्याच्‍या प्रत्‍यारोपणासह बरी होईल.''