सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (16:10 IST)

भारतात प्रथमच: २२ वर्षांच्या तरुणाचे अर्ध्या हाताचे हैंड ट्रांसप्लांट यशस्वी!

बाईक अपघातात बळी पडलेल्या २८ वर्षीय ब्रेन डेड तरुणाने केले हातदान
भारतामध्ये मुंबईतील हा पहिलाच प्रसंग आहे ज्यात अर्धा हात प्रत्यारोपित झाला आहे.
 
रुग्णाचे वर्णन: एप्रिल २०२१ मध्ये टायर फॅक्टरीत कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात 22 वर्षीय तरुणाचे दोन्ही हात यंत्रात अडकले होते. रबराचे गरम द्रव अंगावर पडल्याने त्याचा हात आणि मांड्याही भाजल्या होत्या. त्याचा अर्धा डावा हात पूर्णपणे निकामी झाला होता. अपघातादरम्यान त्याने उजव्या हाताची तीन बोटे (तर्जनी, मधली आणि अनामिका) गमावली. त्याच्यावर भांडुप येथील स्थानिक रुग्णालयात 3 आठवडे उपचार सुरू होते. २ महिन्यांपूर्वी हात प्रत्यारोपणासाठी नोंदणी केल्यानंतर तो हॅन्ड ट्रान्सप्लांटची वाट पाहत होता.  
दाता: अहमदाबादमधील २८ वर्षीय युवक, बाईक अपघातात सापडला आणि ब्रेन डेड झाला. कुटुंबाने हात दान करण्याचा उदार निर्णय घेतला. अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या चार्टर फ्लाइटमध्ये हात मुंबईला आणण्यात आले होते.
 
१० फेब्रुवारी २०२२ रोजी ग्लोबल हॉस्पिटल मुंबई येथे प्रत्यारोपण करण्यात आले. डाव्या हाताच्या कमतरतेमुळे आणि डाव्या हाताला दुखापत झाल्यामुळे रुग्णाला गंभीर कार्यक्षम अपंगत्व आले होते. शस्त्रक्रिया कठीण होती आणि शस्त्रक्रियेचा कालावधी १३ तासांचा होता.
 
निदान: रुग्णाचा डावा हात कापण्यात आला व उजव्या हाताला दुखापत असल्याने अपंगत्व आले होते. त्यामुळे त्याच्यावर हात प्रत्यारोपण करणे मोठे आव्हानात्मक होते. डाव्या बाजूच्या हाताला गंभीर जखमेमुळे अपंगत्व असल्याने उजव्या हाताचे मधले बोट आणि अनामिक वापरून आंशिक प्रत्यारोपण करण्यात आले. मात्र अंगठा आणि करंगळी राखून ठेवण्यात आली.
      
निष्कर्ष: ग्लोबल हॉस्पिटलच्या ऍडव्हान्स टेक्नोलोंजीमुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली, वरिष्ठ सल्लागारांच्या विभागाच्या अंतर्गत वेळेवर हस्तक्षेप आणि सहाय्य केल्याने रुग्ण आता स्थिर आहे.