गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (15:38 IST)

सोफ्यात आढळला महिलेला मृतदेह

डोंबिवलीच्या दावडी येथील शिवशक्ती परिसरात एका महिलेचा मृतदेह सोफ्यात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या महिलेचा गळा आवळून खून केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रिया किशोर शिंदे असे या मयत महिलेचे नाव आहे. घटनेच्या वेळी ती घरात एकटीच होती.  

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व भागात शिवशक्तीनगर परिसरात किशोर शिंदे आपल्या कुटुंबासह राहतात. सकाळी ते कामावर गेले असता त्यांची पत्नी सुप्रिया घरात एकटी होती. मुलगा हा देखील शाळेत गेला होता. संध्याकाळी किशोर घरी आल्यावर त्यांना सुप्रिया कुठेच  दिसली नाही. 

त्यांनी तिचा खूप शोध घेतला नंतर नातेवाईकांकडे विचारपूस केली. सुप्रिया कुठेच दिसली नाही म्हणून ते पत्नी हरवल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात देण्यासाठी पोहोचले. रात्री  घरात दररोज येणाऱ्यांना सोफा विचित्र अवस्थेत ठेवलेला दिसला. त्यांनी सोफा चाचपडल्यावर त्यांनी जे पहिले त्याच्यावर त्यांचा विश्वासच बसेना. त्या सोफ्यात सुप्रियाचा मृतदेह आढळून आला. सुप्रियाचा मृतदेह त्यात कोंबलेला होता. सुप्रियाची गळा आवळून हत्या केली होती.
पोलिसांनी घटनेची माहिती मिळतातच घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनास पाठवला. तिची हत्या का आणि कोणी केली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.