सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जून 2023 (15:35 IST)

दिवसभरात काढलेली एक डुलकी मेंदूसाठी चांगली

लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजच्या संशोधकांच्या मते, दिवसा घेतलेली झोपेची डुलकी आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी चांगली असते.
अशी डुलकी घेणाऱ्या लोकांचा मेंदू 15 घन सेंटीमीटर मोठा असल्याचं या संशोधकांच्या गटाने सिद्ध केलंय.
शिवाय, या लोकांना कमीत कमी तीन ते सहा वर्षे उशीराने वृद्धत्व येत असल्याचं देखील या संशोधकांनी म्हटलंय.
ही झोप अर्ध्या तासापेक्षा कमी असावी असंही शास्त्रज्ञांनी सुचवलंय.
 
पण बहुतेक कामाच्या ठिकाणी दिवसा झोप घेणं शक्य नसतं.
अभ्यासातून असं दिसून आलंय की, बैठं काम करणाऱ्या लोकांवर झोपेच्या कमतरतेचा परिणाम अधिक दिसतो.
 
यावर व्हिक्टोरिया गारफिल्ड सुचवितात की, "दिवसभरात थोडीशी झोप घेतल्याने लोकांना बरेच फायदे होत असतात. त्यामुळे आम्ही प्रत्येकाला हे सुचवितो."
 
डॉ. व्हिक्टोरिया यांनी स्पष्ट केलंय की, यामुळे उत्साह आणि आनंद मिळतो.
 
आपण जेव्हा लहान बाळ असतो तेव्हा आपल्या वाढीसाठी झोप आवश्यक असते. पण जसंजसं तुम्ही मोठे होता तशी तुमची झोप कमी होते.
 
निवृत्तीनंतर किंवा वृद्धापकाळानंतर दिवसा झोपेचा त्रास वाढतो. 65 वर्षांवरील 27 टक्के लोक दिवसा झोपतात.
बहुतेक लोकांना वजन कमी करणं किंवा व्यायाम करणं कठीण वाटतं. पण गारफिल्ड सुचवितात की, त्या तुलनेत झोप घेणं हे सोपं काम आहे.
 
जसजसे आपण मोठे होतो तसतसा आपला मेंदू नैसर्गिकरित्या आकसू लागतो.
 
पण, दिवसा झोप घेतल्यामुळे अल्झायमरसारख्या आजारांपासून बचाव होऊ शकतो का? त्यावर अधिक संशोधनाची गरज आहे.
 
थोडक्यात स्मृतिभ्रंश सारख्या आजाराशी लढण्यासाठी निरोगी मेंदू आवश्यक आहे. या आजारामुळे झोपेचाही त्रास मोठ्या प्रमाणत वाढतो.
 
संशोधकांच्या मते, झोपेच्या कमतरतेमुळे जळजळ होते, कालांतराने आपल्या मेंदूचेही नुकसान होऊ शकते.
 
तसेच, यामुळे मेंदूच्या पेशींवरही परिणाम होतो.
 
पण दिवसा घेतलेल्या झोपेमुळे आपल्याला न्यूरोडीजनरेशनपासून संरक्षण मिळू शकते असं संशोधक व्हॅलेंटीना पाझ सांगतात.
 
झोपेच्या कमतरतेमुळे न्यूरोडीजनरेशन होते.
 
पण डॉ. गारफिल्ड म्हणतात की, कामावर असताना झोपण्यासाठी आरामदायी जागा शोधण्यासोबतच मेंदूला सक्रिय ठेवण्याचे इतर मार्गही शोधले जातात.
 
गारफिल्ड म्हणतात, "प्रामाणिकपणे सांगायचं तर, मी थोडा वेळ झोपण्यापेक्षा 30 मिनिटे व्यायामासाठी घालवू इच्छिते. पण, आतापासून मी झोपायचा प्रयत्न करेन. मी माझ्या आईलाही हे करायला सांगेन."
 
यावर उत्तर शोधायचं कसं?
 
झोपेवर अभ्यास करणं आव्हानात्मक असू शकतं.
 
असं केल्याने तुमचं आरोग्य सुधारू शकतं किंवा उलटही होऊ शकतं. जेव्हा तुम्ही थकलेले असाल तेव्हा तुम्हाला जास्त वेळ झोपण्याची गरज असते.
 
झोपेची एक लहान डुलकी फायदेशीर असते हे सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी एक स्पष्ट तंत्र वापरलं.
 
हा प्रयोग डीएनए वापरून करण्यात आला.
 
संशोधकांच्या टीमने, यूके बायोबँक प्रकल्पाचा एक भाग म्हणून 40 ते 69 वयोगटातील 35 हजार लोकांचा डेटा गोळा केला. यात दिवसा झोप घेणाऱ्यांची आणि दिवसा न झोपणाऱ्यांच्या जनुकांची तुलना केली.
 
स्लीप हेल्थ जर्नलमध्ये याचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले. यात असं म्हटलंय की, जे दिवसा झोप घेतात त्यांचा मेंदू 15 घन सेंटीमीटर मोठा असतो आणि त्यांना 2.6 ते साडेसहा वर्ष उशीराने वृद्धत्व येतं.
 
एडिनबर्ग विद्यापीठाच्या ब्रिटिश न्यूरोसायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रोफेसर तारा स्पायर्स जोन्स म्हणतात "आठवड्याच्या शेवटी मी दिवसभरात थोडी झोप घेण्याचा आनंद घेते. अशी झोप घेणारे आळशी असतात असं मानण्याची गरज नाही हे मला या अभ्यासातून समजलं. शिवाय यामुळे माझ्या मेंदूचा ताण कमी होतो."
 
त्या सांगतात की, "निरोगी मेंदूसाठी झोप आवश्यक आहे. झोपेमुळे मेंदूमध्ये वाढ झाल्याचं या अभ्यासातून दिसून आलं आहे."
 
संशोधकांनी दिवसभरातील जास्त झोपेचा परिणाम थेट तपासला नसला तरी अर्धा तास झोप आवश्यक असल्याचं विज्ञान सुचवते.
 

Published By- Priya Dixit