1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

उन्हाळयात चिमूटभर हिंग करते या आजारांवर उपचार

hing side effects
Hing Surprising Health Benefits: हिंगामध्ये असलेले पोषक तत्व आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. याच्या उपयोगाने अनेक गंभीर आजार दूर होतात. चला जाणून घेऊ या हिंगाचे फायदे....
 
हिंग स्वयंपाक घरातील मसाल्यांपैकी एक पदार्थ आहे. प्रत्येक जण पदार्थ बनवतांना मसाल्यांचा वापर करतात. तसेच डाळ बनवतांना खास करून हिंगाचा उपयोग केला जातो. हिंग घातल्याने पदार्थ चविष्ट बनतात. पण तुम्हाला माहित आहे का हिंग आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतो. हिंगामधील पोषक तत्वे हे मोठ्या मोठ्या आजरांना दूर ठेवतात. 
 
हिंग हे एक प्राचीन आयुर्वेदिक मसाल्यांपैकी एक आहे जे आपल्या अनेक औषधीय गुणांसाठी ओळखले जाते. उन्हाळयात आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. अशावेळेस हिंगाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. 
 
पाचन संबंधित समस्या-
हिंग पाचन तंत्र सुधारण्यासाठी मदत करते. गॅस, अपचन, पोट दुखी यांसारख्या समस्यांपासून अराम मिळतो. हिंगाचे सेवन पाचन एंजाइम्सची एक्टीव्हनेस वाढवतो. ज्यामुळे अन्न लवकर पचते. 
 
एसिडिटी आणि गॅस-
उन्हाळ्यामध्ये एसिडिटी आणि गॅसची समस्या अनेकांना निर्माण होते. एक ग्लास गरम पाण्यामध्ये चिमूटभर हिंग घातल्यास या समस्येपासून आराम मिळतो. 
 
सर्दी आणि खोकला-
हिंगामधील अँटिव्हायरल आणि अँटीबॅक्टीरियल गुण सर्दी आणि खोकला लवकर बरे करतात. गरम पाण्यामध्ये हिंग मिक्स करून त्याच्या गुळण्या केल्यास लवकर आराम मिळतो. 
 
पिरियड पेन-
हिंगामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. जे पिरियड दरम्यान होणाऱ्या दुखण्यापासून आराम देतात. कोमट पाण्यामध्ये हिंग मिक्स करून घेतल्यास पाळी संबंधित सर्व समस्या दूर होतात. 
 
रक्तचाप नियंत्रित ठेवते-
हिंगाचे नियमित सेवन रक्तचाप नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हिंग इन्सुलिनच्या संवेदनशीलतेला वाढवते. तसेच डायबिटीज असलेल्या लोकांसाठी फायदेशीर असते. 
 
सावधानी-
हिंगाचे सेवन मर्यादित करावे कारण जास्त सेवन केल्यास डोकेदुखी, मळमळ यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik