भाजलेले, भिजवलेले की वाफवलेले....जाणून घ्या कोणते चणे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर?
चणे आरोग्यसाठी फायदेशीर असतात. पण भाजलेले, भिजवलेले की वाफवलेले कोणते चणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात जाणून घेऊ या.
चण्यांना पोषक तत्वांचे भांडार संबोधले जाते. रोज चणे खाल्यास शरीराला प्रोटीन, कार्ब्स, आयरन, फायबर मिळते. तज्ज्ञाच्या मते एक आरोग्यदायी व्यक्तीने रोज 50 ते 60 ग्रॅम चणे खावे. पण नेहमी लोक या गोष्टीला घेऊन विचार करतात की, कोणत्या प्रकारचे चणे खाल्यास शरीराला फायदे मिळतील. तर चला जाणून घेऊ या कोणत्या प्रकारचे चणे खाल्ल्यास आरोग्याला फायदे मिळतात.
पोषकतत्वांनी भरपूर आहे चणे
चणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुम्ही कोणत्याही प्रकारचे चणे खाऊ शकतात जसे की, भाजलेले, भिजवलेले, वाफवलेले हे सर्व तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
भाजलेले चणे- अनेक लोकांना भाजलेले चणे जास्त आवडतात. अनेकांना चहा सोबत भाजलेले चणे खायला आवडतात. तसेच चणे सेवन डायबिटीजच्या लोकांसाठी फायदेशीर असते. हृदय आरोग्यदायी राहते.
भिजवलेले चणे-भिजवलेले चणे पोषकतत्वचे भांडार आहे. मोड आलेल्या चण्यांमध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. भिजवलेले चणे स्नायूंना मजबूत बनवतात.
वाफवलेले चणे-वाफलेले चणे खाल्ल्यास हाडे मजबूत होतात. तसेच वाफवलेले चणे खाल्यास आजार दूर राहतात.
चण्यांमध्ये आयरन असते जे रक्त वाढण्यास मदत करते. जर तुमची दृष्टी कमी असेल तर चणे सेवन केल्यास दृष्टी चांगली होते.
चणे खाल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहते. चणे शरीरामध्ये एक्स्ट्रा ग्लूकोजचे प्रमाण कमी करून डायबिटीज कंट्रोल करते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Published By- Dhanashri Naik